सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा 'RRR' आता OTT साठी सज्ज;सविस्तर जाणून घ्या RRR Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramcharan & Jr.NTR (RRR Movie Actors)

सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा 'RRR' आता OTT साठी सज्ज;सविस्तर जाणून घ्या

एस.एस. राजामौली यांच्या 'RRR' सिनेमानं प्रदर्शनाआधीच आपली हवा करुन ठेवली होती. सिनेमाचं कथानक,कलाकार,भलंमोठं बजेट आणि सगळ्यातं मोठं सिनेमाचं अॅसेट म्हणाल तर दिग्दर्शक एस.एस.राजामौली. ऐतिहासिक कथानकाला एस.एस.राजामौली यांनी दिलेला टच आता काम करताना दिसत आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी भल्या-भल्या सिनेमांची विकेट काढतं जगभरात ५०० करोडच्या पुढं बॉक्सऑफिस कलेक्शन केलंय. सिनेइंडस्ट्रीतील साऱ्यांनीच सिनेमाचं तोंडभरून कौतूक केलं आहे. केवळ दाक्षिणात्य भाषांमध्ये नाही तर इतर भाषांमध्येही सिनेमानं लोकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये स्थान मिळवलंय. आता सिनेमागृहात धूमधडाका करणारा हा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: प्रदर्शनाआधीच 2000 कैद्यांनी पाहिला अभिषेक बच्चनचा 'दसवी'

S.S.Rajamouli दिग्दर्शित RRR सिनेमा Netflix वर हिंदी भाषेत तर Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आधी ठरल्याप्रमाणे RRR सिनेमाचं ओटीटी वरील हिंदी व्हर्जन सिनेमाच्या प्रदर्शनानंतर तीन महिन्यांनी म्हणजे साधारण २५ जूनच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं म्हटलं जात आहे. पण इतर दाक्षिणात्य भाषेत मात्र हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शनानंतर दोन महिन्यात दाखवला जाईल अशी बातमी आहे. म्हणजे साधारण २५ मे च्या आसपास हा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

हेही वाचा: सावत्र मुलीशी दिया मिर्झाचं आहे खास बॉन्डिंग! भावूक पोस्टनं वेधलं लक्ष

या सिनेमाचे ओटीटी राइट्स मिळवण्यासाठी भरपूर पैसा खर्ची घातला आहे. फिल्ममेकर्सला सिनेमा साधारण दोन महिने तरी सिनेमागृहात चालवायचा आहे. सिनेमाच्या ओटीटी रीलीजसाठी काही खास प्लॅन आखले गेले आहेत. पण अद्यापही ठोस तारीख RRR सिनेमाच्या ओटीटी रीलीजसाठी सांगण्यात येत नाही,केवळ अंदाज दर्शवले जात आहेत. सध्या RRR बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोच आहे तेव्हा तो आपण सिनेमागृहात एन्जॉय करुच शकत आहोत. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षक ओटीटी रीलीजची वाट पाहत असले,तरी तारीख जाहिर होत नाही याची खंत व्यक्त करताना दिसत नाही आहेत.

Web Title: Rrr On Ott Whats The Release Plan Date

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..