Russia-Ukraine War:'युद्धापेक्षा विकृत काहीच नाही';बॉलीवूड झालं व्यक्त

जावेद अख्तर,तिलोत्तमा शोम,ऋचा चड्ढा अशा अनेकांनी सोशल मीडियावर मतप्रदर्शन केले आहे.
Javed Akhtar, Richa Chadha, Tillotama Shome
Javed Akhtar, Richa Chadha, Tillotama Shomegoogle

रशियाचे(Russia) राष्ट्रपती पुतिन( Putin) यांनी गुरुवारी २४ फेब्रुवारी,२०२२ रोजी जेव्हा युक्रेन विरोधात युद्धाचे आदेश दिले तेव्हा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी यावर आपलं मतप्रदर्शन केलं आहे. अभिनेत्री तिलोत्तमा शोम हिनं आपल्या एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''युद्दापेक्षा विकृत काहीच असू शकत नाही''. अभिनेत्रीनं लिहिलं आहे,''कोरोनाचं सावट अजुनही आहेच आणि त्यादरम्यान कॅन्सरशी झुंज देणाऱ्या माझ्या आईच्या तब्येतीविषयी मी आता खरंतर चिंतेत आहे. पण अशावेळी जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध ( Russia-Ukraine War) आणि कॅंसर रुग्णाविषयीचा विचार एकत्र माझ्या मनात घोळू लागतो तेव्हा मला काहीच सुचत नाही. मन विषण्ण होतं. युद्ध खूप विकृत आहे. युद्धासाठी कोणी आपलं आयुष्य का पणाला लावावं''.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी देखील या युद्धजन्य परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पण त्यांच्या या प्रतिक्रियेनं एका वेगळ्याच चर्चेला वाचा फोडली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे,''जर रशिया-युक्रेन संघर्षामुळे संपूर्ण जगातील न्यायव्यवस्था पेटून उठली आहे,प्रत्येकजण त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर न्याय आणि न्यायाच्या भावनेविषयी बोलत आहे,तेथील दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करीत आहे. मोठमोठ्या देशांनी या युद्धात नकळत उडी घेतली आहे. सगळ्यांच्या मनात युक्रेन नागरिकांचं संरक्षण करण्याची इच्छा जागृत झाली आहे तर मग येमेनसारख्या छोट्या देशावरील बॉम्बस्फोट,तिथे होणारे अत्याचार याविषयावर हे पाश्चिमात्य देश उदासिन का आहेत?'' जावेद अख्तर यांनी हे ट्वीट करीत एका वेगळ्याच विषयाला वाचा फोडल्याचं दिसत आहे.

अभिनेत्री ऋचा चड्ढा ने देखील ट्वीट करत लिहिलं आहे की,''आता जे काही घडेल ते लोकशाही आणि राष्ट्रीय हितासाठी होईल. (जर लोक स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत तर आपण पुन्हा कोणाचेतरी दास बनून राहू)''. या सर्वांनी ट्वीटरवर युद्धासंदर्भात मतप्रदर्शन केलेली ट्वीट्स आम्ही बातमीत दिली आहेत.

पुतिन यांनी टेलीव्हिजनवर भाषणाच्या माध्यमातून युद्धाची घोषणा केली. आपल्या या कारवाई समर्थनार्थ ते म्हणाले,''युक्रेननं स्वतःहून ही आपत्ती ओढवून घेतली आहे. रशियाचा उद्देश्य फक्त देशाच्या त्या भागातील लोकांचं रक्षण करणं हाच आहे''. पण दुसरीकडे जगभरातील अनेक देशांनी युक्रेनला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. बलाढ्य देश अमेरिका प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेणार नसला तरी रशियाला धडा शिकवण्याचा इशारा मात्र त्यानं दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com