RX 100ची अभिनेत्री म्हणते, निर्माता म्हणाला, शरीरसंबंध ठेवतेस का...

वृत्तसंस्था
Monday, 2 September 2019

निर्मात्याने चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलावले अन् कथा ऐकवत असतानाच माझ्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली.

चेन्नईः चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अनेक अभिनेत्रींना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. या विषयी अनेक अभिनेत्रींनी #MeToo सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. पंजाबी अभिनेत्री पायल राजपूत हिनेही तिला आलेल्या वाईट अनुभवाविषयी सांगितले आहे.

नुसरत जहाँच्या असूरचा पोस्टर बघितला का?

पायलने अजय भुपती यांच्या आयएक्स 100 या टॉलिवूडमधील चित्रपटात काम केले होते. 2018 मध्ये हा चित्रपट गाजला होता. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान वाईट अनुभवाविषयी सांगताना ती म्हणाली, 'एका चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटात काम करण्यासाठी मला शरीरसंबंध ठेवायला सांगितले होते. हे ऐकून मला धक्काच बसला. मी लगेच विरोध केला होता. या निर्मात्याने चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलावले अन् कथा ऐकवत असतानाच माझ्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, त्यावेळी मी त्याला चांगलेच सुनावले होते.

मराठी तारकांच्या घरी आले बाप्पा; पाहा फोटो

मला अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. #MeToo चळवळीनंतर अनेकजण समोर येऊन या विषयावर बोलत आहेत, ही गोष्ट खूपच चांगली आहे. पण महिलांचे लैंगिक शोषण होणे हे केवळ चित्रपटसृष्टीत घडते असे नाही... तर सगळ्याच क्षेत्रात ही गोष्ट घडत आहे. काही जणी या विरोधात आवाज उठवतात. तर काहींना आवाज उठवता येत नाही. मी, या विरोधात आवाज उठवला तर मला चित्रपटात काम मिळणार नाही. पण चित्रपटात भूमिका मिळण्यासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही.'

बॉक्स ऑफिसवर साहोचा धुमाकूळ

पायलचे अनेक चित्रपट हिट झाले असून, ती आता वेंकटेश आणि नागा चैतन्य यांच्या वेंकी मामा या चित्रपटात लवकरच झळकणार आहे. रवी तेजाच्या डिस्को राजा या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I'm an old school girl . Wearing @unique_world30

A post shared by Payal Rajput (@rajputpaayal) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RX100 actress Payal Rajput Despite MeToo casting couch still exists