esakal | साथ निभाना साथियामधील सासू कोकिला मोदी रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

rupal patel

'साथ निभाना साथिया' मधील 'सासू कोकिला मोदी' रुग्णालयात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील (television entertainmet) एक धक्कादायक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media) झाली आहे. ती म्हणजे साथ निभाना साथिया (saath nibhana sathitya) या मालिकेमध्ये गोपीची सासू (gopi) म्हणून भूमिका करणारी अभिनेत्री रुपल पटेलला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला नेमक्या कोणत्या कारणासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र अभिनेत्रीचे पती राधाकृष्ण दत्त यांनी याबद्दल सोशल मीडियावर माहिती देताना असे सांगितले आहे की, अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्याचे काही कारण नाही. (saath nibhaana saathiya fame rupal patel hospitalised husband give update health)

ज्यावेळी रुपल यांच्या चाहत्यांना त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. असे कळले त्यावेळी त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या अभिनयानं त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्याच्या घडीला मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असणारी मालिका म्हणून साथ निभाना साथिया या मालिकेचे नाव घेता येईल. रुपल यांची भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

साथ निभाना साथिया नंतर मनमोहिनी आणि ये रिश्ते है प्यार के सारख्या काही कार्यक्रमांमध्येही त्यांनी काम केले होते. 2020 मध्ये रुपल पटेल यांनी साथ निभाना साथिया 2 आणि गँग्स ऑफ फिल्मिस्तान मध्ये एका पाहुण्याच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. साथ निभाना साथिया सारख्या मालिकेनं त्यांना वेगळी ओळख दिली. त्यामुळे त्या मोठ्य़ा प्रमाणावर लोकप्रिय झाल्या होत्या. या शो मध्ये त्यांनी गोपीची खाष्ट सासू म्हणून भूमिका साकारली होती. त्यात त्यांचे नाव कोकिला मोदी असे होते. ती भुमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी होती.

हेही वाचा: 'गाण्याची वाट लावली'; 'चुरा के दिल मेरा'चं रिमेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

हेही वाचा: अखेर राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख जाहीर

साथ निभाना साथिया शो मधील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात शो मधील एका दृश्यामध्ये म्युझिक कंपोझर यशराज मुखाते यानं एक रॅप साँग तयार केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते गाणे अल्पावधीतच सर्वाच्या चर्चेचा विषय़ झाले होते.

loading image