Video : सई-सोनालीने सेटवर लावली आग, डान्स बघून व्हाल घायाळ

Sai Tamhankar Sonalee Kulkarni dance video viral on Social media
Sai Tamhankar Sonalee Kulkarni dance video viral on Social media
Updated on

सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 'धुरळा'ची! धुरळाचं प्रमोशन, टीझर, ट्रेलर, मोशन पोस्टर, स्टारकास्ट या सगळ्याच गोष्टींमुळे धुरळा चर्चेत आला. यातील कलाकारही दररोज सोशल मीडियावर धुरळा उडवत आहेत. कधी हटके फोटो, कधी धमाल, मस्ती असलेले व्हिडिओ शेअर करून ते प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. अशातच अलीकडे व्हायरल झालाय, तो सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या डान्सचा व्हिडिओ!

धुरळा चित्रपटातील 'नाद करा, पण आमचा कुठं' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरवर याच गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या गाण्यात सई आणि सोनाली दोघीही डान्स करताहेत. हा डान्स बघून तुम्हाला गणपती डान्सची आठवण झाल्यावाचून राहणार नाही. त्या व्हिडिओला 'नाच करा पण असा कुठं' असं कॅप्शन दिलंय. त्या इतक्या हटके नाचल्यात की हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यांचा हा व्हिडिओ बघून चाहते वेडे झाले आहेत.

सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींच्याही धुरळामध्ये मूख्य भूमिका आहेत. सई 'हर्षदा'च्या आणि सोनाली 'मोनिका'च्या भूमिकेत दिसतात. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील या दोघी सूना आहेत. निवडणूकीच्या धुरळ्यात या दोघींचा वाटा किती असेल, घरातल्यांना त्यांचा किती पाठिंबा आहे, हे या चित्रपटात बघण्यासारखे असेल. 

सई, सोनाली व धुरळाची सगळी टीम सेटवर धम्माल करताना दिसते. काही दिवसांपूर्वी एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला होता. तोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ अशा तगड्या स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही धुरळा उठत आहे. सत्तासंघर्ष सुरू आहे. अशातच राजकारणाची रणधुमाळी आणि #पुन्हानिवडणूक अशी पंचलाईन असलेल्या या चित्रपटात नक्की काय असेल हे बघण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

धुरळातील कलाकारांनी काही दिवसांपूर्वी #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग ट्विटवर शेअर केला होता. यातून अनेक गैरसमज पसरले. खऱ्या राजकारणासाठी कलाकारांचा उपयोग केला जातो, अशा वावड्या उठल्या, पण झी स्टुडिओजने हा चित्रपट असल्याचे सांगितल्यावर वातावरण शांत झाले. लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शक समीर विद्वांस हे दोघं मिळून महाराष्ट्रात धुरळा उडवून देण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ज्या चित्रपटाने इतका 'धुरळा' उडवला, तो चित्रपट प्रदर्शनानंतर काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com