आधी #पुन्हानिवडणूक गाजली; आता 'धुरळा' उडणार!

Dhurala Marathi movie poster launch
Dhurala Marathi movie poster launch

मागच्या दोन-तीन दिवस ज्या #पुन्हानिवडणूक या हॅशटॅगने धुमाकूळ घातला होता, तो का व्हायरल झाला याचं कारण तर आपल्या समोर आलंच. 'धुरळा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग चालवला गेला. पण या हॅशटॅगने चित्रपटसृष्टीत नाही, तर राजकारणात उलथापालथ झाली. 

अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ अशा तगड्या स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही धुरळा उठत आहे. सत्तासंघर्ष सुरू आहे. अशातच राजकारणाची रणधुमाळी आणि #पुन्हानिवडणूक अशी पंचलाईन असलेल्या या चित्रपटात नक्की काय असेल हे बघण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

चित्रपटातील या कलाकारांनी काही दिवसांपूर्वी #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग ट्विटवर शेअर केला होता. यातून अनेक गैरसमज पसरले. खऱ्या राजकारणासाठी कलाकारांचा उपयोग केला जातो, अशा वावड्या उठल्या, पण झी स्टुडिओजने हा चित्रपट असल्याचे सांगितल्यावर वातावरण शांत झाले. लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शक समीर विद्वांस हे दोघं मिळून महाराष्ट्रात धुरळा उडवून देण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ज्या चित्रपटाने इतका 'धुरळा' उडवला, तो चित्रपट प्रदर्शनानंतर काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com