'पडदा आणि ड्रेस एकसारखाच वाटतोय.. या कमेंटवर कडक सईनं ट्रोलर्सला दिलं बेधडक उत्तर..म्हणाली..Sai Tamhankar reaction on trollers comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

.Sai Tamhankar reaction on trollers comment

Sai Tamhankar: 'पडदा आणि ड्रेस एकसारखाच वाटतोय.. या कमेंटवर कडक सईनं ट्रोलर्सला दिलं बेधडक उत्तर..म्हणाली..

Sai Tamhankar हे नाव आता फक्त मराठी इंडस्ट्रीपुरतं राहिलेलं नाही. आज बॉलीवूडमध्येही सई ताम्हणकरच्या नावाचा हळहळू का होईना दबदबा निर्माण होतोय.

मराठीत 'दुनियादारी', 'क्लासमेट','गर्लफ्रेंड','तू ही रे', 'मिडियम स्पायसी', 'धुरळा','पुणे 52' सारखे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे करुन सईनं मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवलेली आहेच पण बॉलीवूडमध्येही हंटर,मिमी सारख्या सिनेमांतून तिनं आपली चमक दाखवली.

'लॉकडाऊन' या तिच्या ओटीटीवर रिलीज झालेल्या सिनेमातील भूमिकेनंही तिची दखल घ्यायला भाग पाडलं. 'मिमी' मधील भूमिकेसाठी तर तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

सई ताम्हणकरचं व्यक्तिमत्त्व तसं बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती अनेकदा आपल्या ट्रोलर्सला उत्तरं देताना दिसते.

आता पुन्हा एकदा तिच्या काही फोटोवरुन तिला ट्रोल केलं गेलं आणि सईनेही त्याला भन्नाट उत्तर दिलं आहे. (Sai Tamhankar Troll..actress reaction on trollers comment)

सईनं नुकतेच पांढऱ्या रंगाच्या अनारकलीतले फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा ट्रेडिशनल लूक आहे. केसांचा सुंदर बन,त्यातनं चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या देखण्या बटा,कानात अन् माथ्यावर छोटीशी बिंदी...असा एकंदरीत पेहराव सईचा आहे..ज्यात ती मोहक दिसतेय यात काहीच वाद नाही.

पांढऱ्या रंगाच्या भिंतीच्या बॅकग्राऊंडला सई ताम्हणकरनं हे फोटो काढले आहेत. सईच्या या फोटोवर विविध प्रतिक्रिया दिलेल्या दिसत आहेत. यात कुणी तिची प्रशंसा केलीय तर कुणी तिला ट्रोल केलंय.

कोण काय बोललंय ते जाणून घेताना सईनं एका ट्रोलरला दिलेलं भन्नाट उत्तरही आपण जाणून घेऊया.

सई ताम्हणकरच्या त्या फोटोंना ट्रोल करताना कुणी म्हटलंय, 'बाकी सगळं ठीक आहे पण काहीतरी मिसिंग आहे तरीही..' तर कुणी लिहिलंय, 'कोंबडी दिसतेयस आज', तर कुणी लिहिलंय, 'पडदा आणि ड्रेस एक सारखाच वाटतोय बरं का सई…'

आता या ट्रोलर्सच्या कमेंटला उत्तर देत सईन त्याला फॅशनचा धडाही दिला आहे..ती म्हणालीय, 'होय अगदीच खरंय..याला म्हणतात टोन ऑन टोन....' म्हणजे एकाच रंगाचे शेड एकावर एक लावणे..असा पलटवार करत सईनं ट्रोलरची बोलतीच बंद केली आहे.

आता बोल्ड आणि बिनधास्त स्वभावाच्या सईनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय.

आता असे काही नेटकरी तिला ट्रोल करताना काहींनी मात्र तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या कमेंट्स लिहिल्यात आणि इमोजीही पोस्ट केले आहेत.