Saif Ali Khan Hospitalized : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल, गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले (Saif Ali Khan Latest News) आहे.
Devara Actor Saif Ali Khan admitted to hospital
Devara Actor Saif Ali Khan admitted to hospital

Devara Actor Saif Ali Khan admitted to hospital : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले (Saif Ali Khan Latest News) आहे. सैफच्या बाबत समोर आलेल्या त्या बातमीनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.मुंबईतील कोकिलाबेन (Saif Ali Khan Admitted) रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली असून त्याला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमर उजालानं याबाबत वृत्त दिले आहे. सैफच्या गुडघ्याला नेमक्या कोणत्या कारणामुळे दुखापत झाली याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या सोबत त्याची पत्नी करिना कपूर रुग्णालयात आहे. असं म्हटलं जात आहे की, सैफ हा त्याच्या एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना त्याला त्या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात त्याच्या खांद्याला अन् गुडघ्याला दुखापत झाली आहे. वैद्यकीय उपचारानंतर त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सैफच्या त्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सैफ हा तसा सोशल मीडियापासून लांब राहणारा सेलिब्रेटी आहे. त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुणीही ढवळाढवळ केलेली आवडत नाही. तो त्याच्या पर्सनल लाईफबाबत फारस सीरियस असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याची मुलं खेळत असताना तिथे पापाराझ्झींनी फोटो काढले. त्यावरुन सैफ संतापल्याचे दिसून आले.

Devara Actor Saif Ali Khan admitted to hospital
Saif Ali Khan: लहान मुलं आहेत अन् तुम्ही... सैफ अली खानचा राग अनावर, व्हिडीओ व्हायरल

सैफला पर्यटनाची देखील आवड आहे. नुकताच तो पत्नी करिना आणि त्याची मुलं यांच्यासोबत स्वित्झर्लंडला गेला होता. त्यानं तिथले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याची चर्चाही झाली होती. सैफच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास तो साऊथच्या देवरामध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com