Salman Khan : हे काय म्हणाला सलमान खान; बॉलिवूड सोडून दक्षिणेत जाणार?

गॉडफादरचा ट्रेलर समोर येताच चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली
Salman Khan Latest News
Salman Khan Latest NewsSalman Khan Latest News

Salman Khan Latest News सलमान खान (Salman Khan) सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉस १६ सुरू झाला आहे. तसेच चिरंजीवीसोबतचा दक्षिण चित्रपट गॉडफादरचा ट्रेलरही समोर आला आहे. या चित्रपटात भलेही त्याचा कॅमिओ असेल, पण सलमानही साउथमध्ये येणार असल्याने चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण हे काय? काय म्हणाला सलमान? साउथ इंडस्ट्रीमुळे इतका प्रभावित झाला आहे की तो बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेत आहे?

गॉडफादर चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. हा चित्रपट देशभरात दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून सलमानही (Salman Khan) दक्षिणेकडे वळण्याचा विचार करीत असेल. त्याचबरोबर हॉलिवूड सिनेमाकडे वळताना अनेक कलाकार टोमणे मारताना दिसतात.

Salman Khan Latest News
BIGG BOSS 16 : बिग बॉस एका सीझनसाठी किती घेतो फी? जाणून घ्या...

सलमान ना बॉलिवूड सोडत आहे ना तो दक्षिणेत स्थायिक होण्याचा विचार करीत आहे. होय, पण मला साउथ (South) इंडस्ट्रीकडून मिळालेल्या प्रेमामुळे नक्कीच खूश आहे. तिथल्या लोकांचे सिनेमावरचं प्रेम पाहून सलमानला आनंद झाला. ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान सलमानने सांगितले की, साउथचे चित्रपट करण्यात किती रस आहे. तिथल्या चाहत्यांना हिंदी सिनेमांकडे वळवायचं आहे. सलमान मानतो की सिनेमा एकच आहे, फक्त भाषा वेगळ्या आहेत.

‘लोकांना हॉलिवूडला जायचे आहे. मला दक्षिणेत जायचे आहे. सगळे मिळून काम करू लागलो तर अजून किती लोकं येतील याची कल्पना करा’ असा ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला. चिरंजीवीचा गॉडफादर हा तेलगू चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. नयनतारा आणि सत्य देव हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com