सलमानचं फार्महाऊसवर शूट झालेलं 'तेरे बिना' गाणं पाहण्यासाठी तुटून पडले चाहते, गाण्यात सलमान-जॅकलीचा जबरदस्त रोमँटिक अंदाज..

tere bina song 
tere bina song 

मुंबई-  बॉलीवूडचा दबंग खान सलमानचे चाहते त्याच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. गाण्याच्या टिझरने आधीच सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला होता आणि आता तर अभिनेता सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस स्टारर हे मोस्ट वॉन्टेड तेरे बिना गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं रिलीज झाल्यावर लगेचच सोशल मिडीयावर त्याचे चाहते तुटून पडले आहेत. या गाण्यातील सलमान आणि जॅकलीनचा रोमँटीक अवतार सगळ्यांना चांगलाच आवडला आहे.

हे गाणं रिलीज झाल्यावर अर्ध्यातासात २ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. सलमानने तेरे बिना हे गाणं त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर शूट केलं आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतः हे गाणं दिग्दर्शित केलं आहे आणि स्वतः गायलं देखील आहे. तर सलमानचे मित्र अजय भाटिया यांनी या गाण्याला संगीत दिलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलंय. सलमान आणि जॅकलीनवर केलेलं हे गाणं त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर शूट केलं गेलं असलं तरी सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्येच ते शूट करण्यात आलं असल्याचं कळतंय.

या गाण्यात दोघेही निसर्गाच्या सान्निध्यात पेंटिंग, घोडेस्वारी, स्विमिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. सलमान आणि जॅकलीनचा जबरदस्त रोमँटीक अंदाज या गाण्यात दिसला असून दोघांची केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावतेय. लॉकडाऊनच्या काळात सलमानने त्याच्या चाहत्यांसाठी हे दुसरं गाणं तयार केलं आहे. याआधी सलमानने प्यार करोना हे गाणं तयार करुन लोकांना घरातंच राहण्याचं आवाहन केलं होतं तर आज तेरे बिना हे रोमँटीक गाणं रिलीज करुन लॉकडाऊनमध्येही सलमानच्या चाहत्यांना एक चांगलीच ट्रीट दिली आहे.    

salman khan and jacqueline fernandez romance in tere bina song  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com