Salman khan Video:अंबानींच्या पैशांपुढे भाईजान झुकला ! बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचला..

Salman Khan
Salman KhanSakal
Updated on

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांमुळे नाहीतर त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळे. सध्या तो त्याच्या 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतच याच सिनेमाच 'येंटम्मा' हे गाणं प्रदर्शित झालं. याला प्रेक्षकांच भरभरुन प्रेम मिळत आहे.

Salman Khan
Samantha: 'त्याला प्रेमाची कदर नाही म्हणून', नागा चैतन्य अन् शोभिताच्या नात्यावर सामंथा जरा स्पष्टच म्हणाली

त्याच झालं असं की मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे उद्घाटन झाले आहे. या ओपनिंगमध्ये बॉलिवूडशिवाय जगातील अनेक मोठे स्टार्स दिसले. अंबानींच्या या कार्यक्रमात अनेक स्टार्सनेही परफॉर्म केले. ज्यात

आलिया, शाहरुख आणि वरुण धवनच्या डान्सने तर धमालच केली. या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यावेळीच सलमान खानचा ही एक व्हिडिओ ट्रेडिंगला आला .खरं तर हा व्हिडिओ पाच वर्षे जुना आहे. सध्या व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होऊ लागला आहे.

Salman Khan
Marathi Film Industry: शिंदे सरकारमुळे मराठी सिनेमाला येणार अच्छे दिन! आता चित्रपटांना मिळणार फिल्मबाजार पोर्टलचा टेकू

हा व्हिडिओ मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या संगीत सेरेमनीचा असल्याच बोललं जात आहे. या व्हिडिओत सलमान खान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सलमान आणि अनंत व्यतिरिक्त इतर अनेक लोक स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील 'कोई मिल गया' गाण्यावर प्रत्येकजण नाचताना दिसत आहे. आधी अनंत गिटार वाजवतो, यावेळी सलमान सगळ्यांसोबत मागे दिसतो. मग ते गुडघ्यावर बसून नाचू लागतात. नंतर गिटार स्टेप संपल्यानंतर सगळे एकत्र नाचताना दिसतात.

Salman Khan
Malaika Arora: मलायका तू डान्स केली की व्यायाम? गुरु रंधावाच्या गाण्यात जाळ अन् धूर संगटच

मात्र या व्हिडिओत अनंत अंबानी पुढे आहे आणि सलमान त्याच्यासोबत बॅकग्राउंडला डान्स करत आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक सलमानवर टीका करत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत.

अनेक लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काहींनी याला पैशांची ताकद म्हटलं आहे. 'तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही कोणालाही तुमच्या तालावर नाचवू शकता', 'पैसा फेको तमाशा देख तुम्ही पैसे दिले तर तो तुमच्या मागे उभा राहून नाचतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com