सलमानला प्रत्येकवेळी नडणारी 'दीपिका'! शेवटपर्यत भाव दिला नाही|Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan birthday

Salman Khan Birthday : सलमानला प्रत्येकवेळी नडणारी 'दीपिका'! शेवटपर्यत भाव दिला नाही

Why Deepika Padukone not worked with Salman Khan : बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमानला ओळखलं जातं. आपल्या वेगळ्याच स्वॅगसाठी सलमान चर्चेत असतो. त्याच्यासोबत बॉलीवूडमधील कुणी पंगा घेतला तर त्याला चांगलाच धडा शिकवल्याशिलाय सलमान राहत नाही. हे आतापर्यत दिसून आले आहे.

मात्र यासगळ्याला काही सेलिब्रेटी अपवादही आहेत. बॉलीवूडमधील कित्येक अभिनेत्रींनी सलमाननं भलेही त्याच्या चित्रपटातून पहिल्यांदा संधी दिली असेल. पण काही अभिनेत्री या नेहमीच सलमानवर आगपाखड करत राहिल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. हे दोन्ही सेलिब्रेटी भलेही आपल्यात सगळे आलबेल असल्याचे सांगत असले तरी त्यांच्यातील वाद हा साऱ्या बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

Also Read - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

दीपिकाला बॉलीवूडमध्ये आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहे. तिनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत दीपिका अग्रेसर आहे. देशातील सर्वोत्तम सेलिब्रेटींमध्ये दीपिकाचे नाव घेतले जाते. असं असलं तरी सलमान सोबत तिनं नेहमीच नकार दिला आहे. सलमानच्या चित्रपटात काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र दीपिका त्याला अपवाद आहे.

हेही वाचा: Viral Car Video : ढगाकडे बघून चालणारी गाडी; कार डिझायनरला २६ तोफांची सलामी!

मोठ्या पडद्यावर दीपिका आणि सलमान एकत्र आले नाहीत. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं होतं मी त्याच्यासोबत काम करायला नकार दिला आहे. मला वाटत नाही त्याच्यासोबत केमिस्ट्री फार जुळेल म्हणून. असं असलं तरी आमच्यात चांगली मैत्री आहे. असं दीपिकानं यावेळी सांगत चाहत्यांना धक्का दिला होता.