सलमान खान एन्जॉय करतोय मी-टाईम!Salman Khan Feed Banana to Monkey! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

सलमान खानचं मर्कटप्रेम!

सलमान खान हे एक दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्याकडे मदतीसाठी आलेल्या अनेकांना त्यानं खुल्या दिल्यानं सहकार्य केल्याची बरीच उदाहरणं आहेत. मग ती मदत पैशाची असो की सिनेमात काम मिळावं म्हणून. इतकंच नाही तर केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही मदत करण्यास सलमान मागेपुढे पाहत नाही.

सध्या सलमान खान आपल्या कुटुंबासोबत मी टाईम एन्जॉय करतोय. तिथला त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत सलमान खानच्या हातात त्याची भाची अयात शर्मा आहे. आणि तिथे जवळच एका फाऊंटनवर दोन माकड बसलेले दिसत आहेत. जे काहीतरी खायला मिळावे या आशेनं सलमानकडे पाहतायत. तेव्हा सलमान हातात दोन केळी घेऊन आला आणि आपल्या भाचीसोबत तो त्या माकडांना केळं भरवताना दिसत आहे. तेव्हा माकडांनी आपल्याकडूनही केळं खाल्ल्यावर लहानगी अयात खूश होऊन टाळ्या वाजवताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे एकाअर्थाने सलमान आपल्या भाचीला प्राणीप्रेमाचे धडे देतोय का, अशीच चर्चा सलमानचे फॅन्स करताना दिसतायत. अयात ही सलमानची लहान बहिण अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्माची मुलगी आहे.

हेही वाचा: माझं नाव बदनाम करण्याचा कट, पत्नीच्या आरोपांवर अनिकेतची प्रतिक्रिया

2019 मध्ये सलमानने असाच एक व्हिडिओ शेअर केला होता,ज्यामध्ये तो एका माकडाला प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पाजत होता. पाणी पिण्यासाठी बोलावताना त्यानं माकडांना 'बजरंगी भाईजान' अशी हाक मारली. पण माकडाने प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्यास नकार दिला. तेव्हा त्यानं माकडाला पुन्हा पाणी ग्लासमधून आणून दिलं होतं. आणि माकड लगेचच ते पाणी प्यायले होते. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना तेव्हा सलमाननं त्याला अतिशय समर्पक असं कॅप्शन देत त्यात म्हटलं होतं,"हमारा बजरंगी भाईजान प्लास्टिक की बॉटल से पानी नही पिता"...हे कॅप्शन देऊन सलमानने एकप्रकारे प्लास्टिकचा वापर टाळावा हा संदेश आपल्या चाहत्यांना दिला होता.

Salman Khan,Ayush Sharma,Antim

Salman Khan,Ayush Sharma,Antim

सलमानचा 'अंतिम-द फायनल ट्रुथ' हा सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. ह्या सिनेमात अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. 2018 मध्ये मराठीत आलेल्या 'मुळशी पॅटर्न' या सिनेमाचा हा रिमेक आहे. लॉकडाऊन सुरू राहिला असता आणि सिनेमागृह बंद असती तर आम्ही हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार होतो. पण आता आम्ही सिनेमागृहात तो प्रदर्शित करतोय याचा अधिक आनंद आहे असं सलमान खान एका मुलाखतीत म्हणाला.

loading image
go to top