Salman Khan: दुबईत राहण्याची भाषा करणाऱ्या भाईजानला शेवटी महाराष्ट्रानेच वाचवलं... बघा काय घडलं

दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं मला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून येते आहे, असं सलमान म्हणाला
kisi ka bhai kisi ki jaan,  ram charan, salman khan, vyankatesh, maharashtra, maharashtra din
kisi ka bhai kisi ki jaan, ram charan, salman khan, vyankatesh, maharashtra, maharashtra dinSAKAL

Salman Khan News: किसी का भाई किसी कि जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Bhai Jaan) सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजूनही तग धरून आहे. हळूहळू का होईना सलमानचा सिनेमा १०० कोटींच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.

सलमान खानचा हा सिनेमा तसा फ्लॉप म्हणून घोषित झालाय. सलमानची जादू फिकी पडली. काहीच दिवसांपूर्वी सलमानने मला भारतापेक्षा दुबईत सुरक्षित वाटतं असं भाष्य केलं होतं. आता किसी का भाई किसी कि जान चं कलेक्शन होण्यासाठी सलमानला महाराष्ट्रच मदतीला आलाय.

(salman khan kisi ka bhai kisi ki jaan box office collection is good on maharashtra din)

kisi ka bhai kisi ki jaan,  ram charan, salman khan, vyankatesh, maharashtra, maharashtra din
चहात जशी विरघळते खारी, तसाच मी तुझ्या प्रेमात गौरी .. Girija Prabhu

वीकेंडमध्ये विशेष काही कमाई न करता सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण होण्याची शक्यता होती. पण विशेष म्हणजे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा झाला आहे.

वीकेंडपूर्वी, 'किसी का भाई किसी की जान'ने गेल्या शुक्रवापर्यंत म्हणजेच ५ दिवसात 2.15 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते.

पण नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच सोमवारी केवळ एका दिवसात किसी का भाई किसी कि जान सिनेमाने 2.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी सलमानच्या सिनेमाला चांगला फायदा झाल्याचं दिसतंय.

kisi ka bhai kisi ki jaan,  ram charan, salman khan, vyankatesh, maharashtra, maharashtra din
Jai Jai Swami Samartha: जेव्हा स्वामींची भूमिका साकारणारा अक्षय अक्कलकोटला जातो तेव्हा..

सलमानने दुबई आवडते म्हणून केले होते भाष्य..

सलमान नुकतंच आप की अदालत मध्ये सहभागी झालेला. यावेळी भारत आणि दुबईमधील त्याच्या सुरक्षेविषयी मत प्रदर्शन केलं आहे. तो म्हणतो आता मला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे.

दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं मला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून येते आहे. मला जे काही करायला सांगण्यात आले आहे ते मी अतिशय सावधानपूर्वक करतो आहे. खूप काळजी घेतो आहे.

मुंबई पोलिसांकडून सलमानला वाय दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. आप की अदालत नावाच्या कार्यक्रमामध्ये सलमाननं जे मतप्रदर्शन केले आहे.

त्यामुळे त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यानं आता आपल्याला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटत आहे. असे म्हटले आहे.

पण किसी का भाई किसी कि जान सिनेमाला महाराष्ट्र दिनाचा चांगलाच फायदा झालेला दिसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com