भाईजानला 'ईद' पावली ! Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan बॉक्स ऑफिसवर एकाच दिवसात सेंच्युरीच्या उंबरठ्यावर

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan esakal

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan box office collection day 3 : सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटावर चाहत्यांच्या खुपच समिंश्र प्रतिक्रिया आल्यात. अनेकांना हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर वाटला तर काहींना खुपच खराब. चित्रपटाची सुरुवातही खुपच संथ झाली होती. दोन दिवसात या चित्रपटानं केवळ 25 कोटींच्या आसपास गल्ला जमावला होता.

त्यामुळे हा चित्रपट सलमानच्या फ्लॉप चित्रपटांमध्ये गणला जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र भाईजानच्या चाहत्याने सलमानच्या या चित्रपटाला तारलं आहे असं काहीस चित्र तिसऱ्या दिवसाच्या कमाईच्या आकडेवारीवरुन वाटत आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Amitabh Bachchan Tweet: 'खेल खतम, पैसा हजम?!', अमिताभ इलॉन मस्कवर पुन्हा भडकले.. अलाहाबादी शैलीतच झापलं

पण आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला आहे. या चित्रपटाची कमाई ही 100 कोटींच्या आसपास जाईल असा अंदाज लावला जात आहे. ईदच्या एक दिवस आधी म्हणजे 21 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 22 एप्रिल रोजी कमाईच्या बाबतीत चांगली वाढ केली.

रिपोर्ट्सनुसार, KKBKKJ ने तिसऱ्या दिवशी 26.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाची एकूण कमाई 64.25 कोटी रुपयांच्या जवळपास झाली आहे. आता या वेगाने या चित्रपटाची घोडदौड सुरु राहिली तर तीन दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये या चित्रपटाची एंट्री होऊ शकते.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Rakhi Sawant: 'माझा जीव घ्या पण माझ्या भावाला..', सलमानसाठी राखी जीव देण्यासही तयार! बिश्नोई गँगला थेट...

तरी आता या चित्रपटाचा पहिला विकेंड संपला असला तरी सलमानचे चाहते अजूनही या चित्रपटाबद्दल उत्सूक दिसत आहे. सलमान देखील त्याच्यांवर खुप खूश दिसला. त्यानेही पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Badshah Apologise: अखेर बादशहा झुकलाच! भोलेनाथच्या भक्तांनी 'सनक' उतरवली...

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात व्यंकटेश, भूमिका चावला, जगपती बाबू, विजेंदर सिंग, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम आणि इतर कलाकार आहेत. साडेतीन वर्षांनंतर सलमान मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com