
आमिर खान(Aamir Khan) याचा बहुचर्चित सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'(Lal Singh Chaddha) आपल्या कथानकामुळे खूपच चर्चेत आहे. आता बातमी कानावर येतेय की सलमान खान(Salman Khan) या सिनेमात आधी एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार होता. पण आता त्यानं त्यासाठी नकार कळवला आहे. कारण स्वतः सलमान त्याच्या 'टायगर ३' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
बॉलीवूड हंगामाला मिळालेल्या वृत्तानुसार सलमानने वेळ नसल्याकारणानं 'लाल सिंह चड्ढा' मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्यास नकार कळवला आहे. बोललं जातंय की सलमानने ही भूमिका आपल्या सिनेमात साकारावी यासाठी आमिरनं खूप प्रयत्न केले होते. स्वतः आमिरने सलमानच्या वेळेनुसार शुटिंग करावे असे आदेश दिले होते. पण आधी कोरोनाच्या निर्बंधांमुळे ते शक्य झालं नाही आणि आता सलमानच्या व्यस्त शेड्युलमुळे ते शक्य होत नाही आहे. कारण सलमान आता अभिनेत्री कतरिना कैफसोबत 'टायगर ३' सिनेमाचं शूटिंग करीत आहे. आणि म्हणून आता सलमाननं आमिरला नकार कळवला आहे. पण यामुळे आमिर सलामानवर थोडा नाराज झाल्याचं समजतंय.
अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमात आमिर खान महत्त्वाची भूमिका करीत आहे. तर आमिर सोबत करिना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गम्प' या अमेरिकन सिनेमाचा रीमेक आहे असं बोललं जात आहे. वेगवेगळ्या काळातील अनेक राजकीय घडामोडी,आंदोलनं या सिनेमात दाखवली जाणार आहेत. 'वायकॉम 18' ची निर्मिती असलेला हा सिनेमा भारतात जवळजवळ १०० ठिकाणी प्रदर्शित केला जाणार आहे. आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा १४ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार होता. पण आता समजतंय की सिनेमाच्या निर्मात्यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी देखील कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या गेल्या आहेत. पण आता सिनेमाची तारीख पुढे ढकलण्याचं नेमकं काय कारण आहे हे मात्र समजलेलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.