esakal | किक चित्रपटाचा सीक्वेल येणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

किक चित्रपटाचा सीक्वेल येणार नाही

किक 2ची कथा सलमानच्या पसंतीस पडली नाही. त्यामुळे चित्रपट न करणं योग्यच हा निर्णय दिग्दर्शक साजिदनेही घेतला. त्यामुळे सध्यातरी किक 2 चित्रपट तयार होणं शक्य नाही.

किक चित्रपटाचा सीक्वेल येणार नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान - जॅकलिन फर्नांडिसच्या किक चित्रपटाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असला तरी सलमान-जॅकलीनच्या जोडीने किकला चार चॉंद लावले. तसेच रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट भाईजानच्या चाहत्यांसाठी पैसा वसुल चित्रपट ठरला. आणि म्हणूनच दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग बनविण्याची तयारी सुरुवात केली. साजिदने याबबात अधिकृत घोषणाही केली होती. मात्र आता हा चित्रपट डब्यात गेला आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किक 2ची कथा सलमानच्या पसंतीस पडली नाही. त्यामुळे चित्रपट न करणं योग्यच हा निर्णय दिग्दर्शक साजिदनेही घेतला. त्यामुळे सध्यातरी किक 2 चित्रपट तयार होणं शक्य नाही. मात्र प्रेक्षकांकडून अजूनही किक 2 चित्रपट तयार करावा अशी मागणी होत आहे. सलमान-जॅकलीनला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

ऋषी कपूर यांनी राज्य सरकारला केलेल्या मागणीवरून सोशल मिडियावर झाले ट्रोल

सलमानने इंशाअल्लाह या चित्रपटामधूनही काढता पाय घेतला आहे. आता किक 2 चित्रपटही होणार नसल्याने सल्लुमियॉंचे चाहतेही उदास झाले आहेत.

Coronavirus : चित्रीकरण बंद झाल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट आणि कामगारांना आर्थिक फटका