Salman Khan: ऐश्वर्या- सलमान खान आमने सामने.. होणार चुरशीची लढत...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Vs Ponniyin Selvan 2
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Vs Ponniyin Selvan 2Esakal

बॉलीवूडच्या बिग स्टार्सचे बहुप्रतिक्षित चित्रपट, ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती, हे चित्रपट 2023 साली प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपटही पुढच्या वर्षी येणार आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Vs Ponniyin Selvan 2)

सलमानच्या चित्रपटासोबत स्पर्धा करण्यासाठी भलेभले घाबरतात. मात्र यावेळी सलमानच्या भाईजानच्या चित्रपटाला ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोनीं सेल्वन 2' टक्कर देणार आहे.

नुकतीच ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन: I या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. PS-2 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होईल. तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Vs Ponniyin Selvan 2
Salman Khan: क्या बात! सलमाननं स्वत:च्या हाताने लिहिलं चाहत्यांना पत्र; वाचा काय लिहिलयं त्यात...

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चाहते दोन्ही चित्रपटांची वाट पाहत होते, आता यापैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो हे पाहावे लागेल.

ऐश्वर्या रायच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.

या चित्रपटात ऐश्वर्या रायशिवाय प्रकाश राज, त्रिशा, किशोर आणि सरथकुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील संगीत ए आर रहमानने दिले आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Vs Ponniyin Selvan 2
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस ४’चा पहिला फायनलिस्ट समोर ..'या' स्पर्धकानं घेतली महाअंतिम सोहळ्यात झेप...

सलमान खानचा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होणार होता, पण हे वर्ष बॉलिवूडसाठी खास राहिले नाही. हे पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

 2022 मध्ये रिलीज झालेल्या PS 1 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'विक्रम वेधा'शी टक्कर झाली होती. जागतिक स्तरावर या चित्रपटाने 450 कोटींहून अधिक कमाईचा शानदार व्यवसाय केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com