Salman Khan: क्या बात! सलमाननं स्वत:च्या हाताने लिहिलं चाहत्यांना पत्र; वाचा काय लिहिलयं त्यात...

Salman Khan
Salman KhanEsakal

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा 27 डिसेंबरला 57 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टीही झालीय. शाहरुख खानपासून सहकलाकार पूजा हेगडेपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. इतकेच नाही तर सुपरस्टारची झलक पाहण्यासाठी त्याच्या गॅलेक्सी घराबाहेर त्याचे अनेक चाहतेही जमले होते.

Salman Khan
Salman Khan Birthday Bash: 'बर्थडे आहे भावाचा अन् जल्लोष साऱ्या गावाचा!' सलमानच्या पार्टीची यांनी वाढवली रंगत...

सलमानचा वाढदिवस साजरा करणे एखाद्या सणापेक्षा कमी नाही, त्याच्या चाहत्यांनी असं काही केलं की त्याचा दिवस जास्तच खास बनला. त्यांनी सलमान खानची एक स्वत:च्या हाताने लिहिलेली जुनी नोट शेअर केली, जी 'मैने प्यार किया'च्या दिवसात त्याने लिहिली होती.

सलमानने हे हस्तलिखित पत्र 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या चार महिन्यांनंतर लिहिलं होते. यापत्रात, सलमानने चाहत्यांनी त्याला दिलेल्या प्रेमांबद्दल आभार मानले आहेत.

Salman Khan
Salman Khan Birthday: भाईजान अन् त्याचे वाद... लिस्ट बरीच लांब.....

त्याने लिहिले, "तुम्ही माझ्याबद्दल जाणून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आधीतर मला स्वीकारल्याबद्दल आणि माझे चाहते झाल्याबद्दल तुमचे आभार मानतो. मी माझ्या निर्णयानुसार चांगल्या स्क्रिप्टवर लक्ष देत आहे. कारण मला माहित आहे की मी आता जे काही करणार आहे त्याची तुलना 'मैने प्यार किया'शी केली जाईल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही माझ्या चित्रपटाबाबत काही घोषणा ऐकाल तेव्हा विश्वास ठेवा तो एक चांगला चित्रपट असेल आणि त्यात 100% मेहनत करणार आहे."

पुढे तो लिहितो, "मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हीही माझ्यावर प्रेम करत राहणार अशी मला आशा आहे, कारण ज्या दिवशी तूम्ही माझ्यावर प्रेम करणं बंद कराल त्या दिवशी तुम्ही माझे चित्रपट पाहणं बंद करालं आणि तोच माझ्या करिअरचा शेवट असेल. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला फार काही सांगायचं नाही, तुम्हाला ते आधीच माहित आहे."

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

”या पत्राच्या शेवटी तो म्हणतोय, “लोक म्हणतात की मी ते मिळंवलय आहे पण मला तसं वाटत नाही. मला अजून ते मिळवायच आहे पण मला एक गोष्ट माहित आहे, तुम्ही मला स्वीकारलं आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com