Sam Bahadur OTT Released : विकी कौशलचा सॅम बहादूर 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर हा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sam Bahadur OTT Released 26 Jan Zee 5 Movie
Sam Bahadur OTT Released 26 Jan Zee 5 Movieesakal

Sam Bahadur OTT Released 26 Jan Zee 5 Movie : प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार (Meghna Gulzar Director) दिग्दर्शित सॅम बहादूर हा आता ओटीटीवर प्रदर्शित (Sam Bahadur OTT Released ) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी समोर येत आहे.

विकी कौशलनं भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारुन आपल्या (Vicky Kaushal Latest News) अभिनयाचे नाणे किती खणखणीत आहे हे दाखवून दिले होते. त्यात सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. खरं तर संदीर रेड्डी वांगाच्या अॅनिमल सोबत सॅम बहादूर प्रदर्शित झाला होता. त्याचा मोठा फटका या चित्रपटाला बसला होता. रणबीरच्या अॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली होती.

गेल्या वर्षी १ डिसेंबरला सॅम बहादूर प्रदर्शित झाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मेघनाच्या या चित्रपटानं फिल्म फेयरमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले. अखेर हा चित्रपट झी ५ नावाच्या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. इंडिया टुडेनं याबाबत माहिती दिली आहे.

अॅनिमल आणि सॅम बहादुरच्या ओटीटी रिलीजची डेट देखील सारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अॅनिमल हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो आहे तर विकी कौशलचा सॅम बहादूर हा झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये विकी कौशलचा सॅम बहादूर पाहता आलेला नाही त्यांच्यासाठी २६ जानेवारी पासून वेगळी पर्वणी असणार आहे.

Sam Bahadur OTT Released 26 Jan Zee 5 Movie
Ranbir Kapoor Viral Video : श्रीरामाच्या दर्शनाला आला की कतरिना सोबत फोटो काढायला? रणबीरच्या 'त्या' सेल्फीची चर्चा!

ओटीटीवर सॅम बहादूर प्रदर्शित होतो यावर दिग्दर्शिका मेघना गुलजार म्हणाल्या की, हा चित्रपट माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. त्यासाठी सगळ्यांनीच घेतलेली मेहनत प्रचंड होती. मी प्रेक्षकांची आभारी आहे की, त्यांनी सॅम बहादूरला मोठा प्रतिसाद दिला. सॅमची स्टोरी ही अनेकांसाठी मोठी प्रेरणादायी असल्याचे मेघना यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com