Sandeep Reddy Vanga : माझ्या सात वर्षाच्या मुलानं 'तो' सीन पाहिला अन् म्हणाला...'ॲनिमल'च्या संदीप रेड्डीनं काय सांगितलं?

या चित्रपटामध्ये (Animal Movie) खूपच हिंसा आहे, मारधाड आहे. असे निरीक्षण पत्नीनं नोंदवलं होतं पण...
Animal Movie
Animal Movie esakal

Animal Movie : ॲनिमल चित्रपटावरुन सुरु झालेला वाद अजुन संपलेला नाही. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी त्यांच्या कुटूंबियांना तो चित्रपट कसा वाटला याविषयी सांगितलं आहे. त्यात त्यांच्या मुलानं जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती हे देखील दिग्दर्शकानं सांगितलं आहे.

ॲनिमल (Animal Movie) पाहिल्यावर पत्नीची प्रतिक्रिया काय होती?

त्या मुलाखतीमध्ये संदीप रेडडींनी सांगितलं की, ॲनिमलमध्ये जे सीन होते त्याबाबत तिचा कोणताही आक्षेप नव्हता. त्यावरुन ती मला काहीही बोलली नाही. पण जे अतिरंजीत मारधाडीचे प्रसंग होते त्यावर ती नाराज (Animal Movie Latest News) होती. मी माझ्या मुलाला अर्जुन रेड्डीला देखील ॲनिमल चित्रपट दाखवला होता. आज तकनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

सिद्धार्थ काननसोबत दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा बोलत होता. तो म्हणाला, आम्ही काय केलं की, जे सीन्स मुलाला दाखवता येणार नाहीत ते एडिट केले. आणि त्याचे वेगळे व्हर्जन हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करुन घेतले आणि त्याला तो चित्रपट दाखवला. आम्ही जेव्हा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये होतो तेव्हा त्यानं जो चित्रपट पाहिला. पण मी प्रौढांसाठींचे जेवढे प्रसंग आहेत ते एडिट केले होते. माझ्या मुलाला हिट आणि सुपरहिट कॉन्सेप्ट काही समजत नाही. असेही रेड्डींनी सांगितले.

दिग्दर्शकानं हसून सांगितलं की, माझ्या मुलाला तो अंडरवियरचा सीन फारच वेगळा वाटला. त्यानं त्यावरुन काही गमतीशीर प्रश्न विचारले. मला त्यावर काही बोलता आले नाही. पत्नीला माझ्या फिल्मोग्राफीची माहिती आहे. मी कोणत्या प्रकारचे चित्रपट तयार करु शकतो याची तिला जाणीव आहे. ती माझी खरी समीक्षक आहे असे मला वाटते. मला घरातूनच प्रामाणिकपणे प्रतिसाद मिळतो.

या चित्रपटामध्ये खूपच हिंसा आहे, मारधाड आहे. असे निरीक्षण पत्नीनं नोंदवलं होतं पण तिनं चित्रपटातील बाकीचे प्रसंग, लग्न, लग्नसंबंध यावर कोणतेही मत दिले नव्हते. असेही वांगा रेड्डी यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

विरोधकांकडून प्रचंड टीका झाल्यानंतरही त्याला तितक्याच परखडपणे उत्तरं देण्यात दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे काही मागे राहिलेले नाहीत. त्यांनी आतापर्यत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, कंगना रनौत, दिग्दर्शिका किरण राव यांना सुनावले आहे. त्यामुळे संदीप रेड्डी वांगा चर्चेत आले आहेत.

Animal Movie
Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

ॲनिमलनं बॉक्स ऑफिसवर तब्बल ९०० कोटींची कमाई करुन एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. ओटीटीवर आल्यानंतरही त्याचे वेगळे व्हर्जन प्रेक्षकांसमोर येणार का अशी विचारणा केली जात होती. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com