
Sanjay Dutt viral video: संजू बाबाचा बायकोसोबत रोमँटिक डान्स व्हायरल..नेटकरी म्हणाले, 'जरा दमानं'
संजय दत्त आणि मान्यता हे लग्नाचा १५वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या नवऱ्याला शुभेच्छा देतांना मान्यता हिने एक व्हडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संजय दत्त पत्नी मान्यतासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.
ज्यामध्ये ती अमिताभ बच्चन यांच्या 'कालिया' चित्रपटातील 'तुम साथ हो जब अपने' गाण्यावर संजय दत्तसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मान्यताने संजय दत्तला त्याच्या १५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
हा भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर करत मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ 21 वर्षे झाली, आमच्याकडून चुका झाल्या, आम्ही माफी मागितली, आम्ही दुसरी संधीही दिली. आम्ही माफ केले, आम्ही मजा केली, आम्ही धीर धरला, आम्ही प्रेम केले, 15 व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी 15 अॅनिव्हर्सरी माय हाल्फ".
जय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तनेही मान्यताच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले, हॅपी एनिवर्सरी. याशिवाय इंडस्ट्रीतील मित्रांनीही या पोस्टवर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यात झरीन खान, नंदिता महतानी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
तर चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मात्र त्याचवेळी अनेकांना संजु बाबाचा डान्स व्हिडिओ आवडलेला नाही असं काहीसं कमेंटवरुन दिसतयं. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, तो तिला किती जोरात ढकलत आहे आणि इतक्या वेगानं खेचत आहे, हा कसला डान्स आहे.
तर एकाने म्हटले आहे - तो जरा जास्तच नशेत दिसत नाही का? एकानं लिहिलयं की, संजय दत्त डान्स करण्याच्या मूडमध्ये नाही असं दिसतयं तर दुसर्या यूजरने लिहिले - माय गॉड, तो खूप नशेत आहे.तर अजुन एका कमेंट मध्ये बाबा हाई झाला आहे. असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.