संजू बाबा गोत्यात! पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या सोबतच्या फोटोने वाद

अनेकांनी संजय दत्तच्या या फोटोवर राग व्यक्त केला आहे.
Pervez Musharraf
Pervez MusharrafTeam eSakal

उरीमध्ये २०१६ला झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर बिघडलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये अद्यापही सुधारणा होऊ शकलेल्या नाहीत. त्या घटनेनंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. तसंच पाकिस्तानी स्टार्सना भारतात टोकाचा विरोध सहन करावा लागत होता. दोन्ही देशांमधील हा तणाव आजही कायम आहे. मात्र आता अशा परिस्थितीत तुम्हाला बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्त पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत दिसून आलाने संजय दत्त अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Pervez Musharraf
'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'
Pervez Musharraf
"जात धर्म घरीच ठेवा"; काश्मीर फाईल्सवर नानांची प्रतिक्रिया

शत्रु राष्ट्राच्या माजीराष्ट्रपतींसोबत संजय दत्त दिसून आल्याने त्याच्यावर टीका होतेय. संजय दत्तचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या मध्ये तो परवेझ मुशर्रफ यांना भेटला असल्याचं दिसतंय. दोघांची ही भेट दुबईत झाल्याचं दिसतंय. हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर अनेकांचं म्हणणं आहे की, संजय दत्त आणि मुशर्रफ यांची भेट जिममध्ये झाली होती. फोटोमध्ये परवेझ मुशर्रफ व्हीलचेअरवर बसलेले आहेत. त्याचवेळी संजय दत्त त्यांच्याशी बोलताना दिसत आहे.

Pervez Musharraf
पॅरिसच्या रस्त्यावर चक्क आयफेल टॉवरसमोर महिलांनी केला 'गंगूबाई डान्स'

दरम्यान, हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर मुशर्रफ आणि संजय दत्त यांची भेट अनेकांना खटकली आहे. सोशल मिडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिलं की, "हुकूमशहा जनरल मुशर्रफ संजय दत्तसोबत हँग आउट करत आहेत. काय चालू आहे?" तर आणखी एकानं लिहिलं की, "कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय मूर्खपणा करतोय?." तर काहींनी संजयला ड्रग्ज, दारू, बंदुका आणि दाऊद इब्राहिम आवडतो असं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com