
"जात धर्म घरीच ठेवा"; काश्मीर फाईल्सवर नानांची प्रतिक्रिया
Bollywood Movies: बॉलीवूडच्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटानं सध्या (The kashmir Files) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotry) दिग्दर्शित या चित्रपटानं वेगळ्या प्रकारचा माहौल तयार केला आहे. त्यावर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी मुक्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी देखील काश्मिर फाईल्सवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यावरुन नानांनी समाजात जात धर्म यांच्या नावाखाली जे काही सुरु आहे त्यावर चिंता व्यक्त केली आहे. काश्मिर फाईल्सला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दुसरीकडे त्यावरुन दोन गट पडल्याचे सोशल मीडियावरुन दिसत आहे. झुंड (Jhund) आणि द काश्मिर फाईल्स असा हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात एक कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या नानांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सध्याच्या परिस्थितीवर नानांनी गंभीरपणे भाष्य केलं आहे. ते म्हणाले, एखाद्या चित्रपटाबद्दल वाद होणं बरं नाही. मी काही काश्मिर फाईल्स पाहिलेला नाही. मात्र त्याबाबत ऐकलं आहे. इथले हिंदू इथले मुस्लीम इथलेच आहेत त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. तेढ निर्माण करणं हे कुठलंही समाज करत नाहीत तो माणूस जो हे करतो त्याला तसं करण्यामागचं कारण विचारणं गरजेचं आहे. सगळे छान राहत असताना कोणीतरी जाणीवपूर्वक बिब्बा घालायचा प्रयत्न करत असेल तर ते गंभीर आहे.
चित्रपट जसा आहे तो तसा पाहा त्यातली वस्तुस्थिती काही जणांना पटेल काही जणांना पटणार नाही. त्यामुळे ते गट पडणं साहजिक आहे मात्र त्यामुळे तेढ होऊ नये. गोष्टींची नावं बदलून काही होणार नाही. आपल्याला एकमेकांना आधार वाटणं गरजेचे आहे. आपल्या भारतीय लोकांना आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. हे भारतीय लोकांना पटत नाही तोपर्यंत हे असे चिथवणारे यावर आपली पोळी भाजून घेणारे खूप असतील. परदेशी लोकं निघून गेले की तुम्हाला आपण भारतीय आहोत याची आयडेंटीटी आठवते. मग इथे असल्यावर तुम्हाला जात धर्म कसे आठवतात असा प्रश्नही नानांनी यावेळी उपस्थित केला. आणि आपण भारतीय आहोत हे मानावं जात धर्म घरी ठेवावेत. या शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हेही वाचा: Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'
Web Title: Bollywood Actor Nana Patekar Reaction On The Kashmir Files Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..