41 वर्षांचं 'रॉकी' कनेक्शन; संजुबाबा भावूक, आईबद्दल ट्विट करत म्हणाला...|Sanjay Dutt Rocky movie completed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Dutt news

41 वर्षांचं 'रॉकी' कनेक्शन; संजुबाबा भावूक, आईबद्दल ट्विट करत म्हणाला...

Bollywood News: बॉलीवूडचा संजु बाबा हा नेहमीच त्याच्या हटकेपणामुळे प्रसिद्धीच्या झोतात (Bollywood Actor) आला आहे. कोणी काहीही म्हटलं तरी आपल्याला जे योग्य वाटतं (Sanjay Dutt) त्यानुसार वागायचं हा संजय दत्तचा स्वभाव आहे. तो त्याच्या तापट स्वभावामुळेही ओळखला जातो. कोणेएकेकाळी अंमली पदार्थांच्य़ा आहारी गेलेल्या संजुच्या व्यक्तिमत्वावर (bollywood movie) मोठा परिणाम झाला होता. त्याची सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. यासगळ्यात त्याच्या फिल्म करिअरला देखील सुरुवात झाली होती. त्याचा पहिला चित्रपट रॉकी प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाची हदय आठवण त्यानं यापूर्वी अनेक कार्यक्रमातून सांगितली आहे. आपल्या या चित्रपटाचा प्रीमिअर होता आणि त्याच्या तीन दिवसांपूर्वीच आईचा मृत्यु झाला. त्यामुळे कमालीचे अस्वस्थ झालो होतो. असेही संजयनं सांगितलं होतं. सध्या सोशल मीडियावर त्यानं दोन पोस्ट केल्या आहेत. त्या चर्चेत आल्या आहेत.

एका पोस्टमध्ये संजयनं रॉकीला 41 वर्षे झाल्याचे म्हटले आहे. चित्रपटांमधील प्रवास त्यावेळी सुरु झाला होता. त्याचे अनेक साक्षीदार होते. त्यातील काहीजण आहेत. काही आपल्यात नाही. मात्र त्यांच्या आठवणींन मला अजुनही कासावीस होते. त्यामुळे मनात कालवाकालव होते. तो काळ मोठा भारावलेला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी त्याच्याशी जोडले गेल्या आहेत. त्यावेळी पहिल्यांदा रॉकी केला. आज त्याला 41 वर्षे झाली. आणि आता दुसऱ्यांदा अधिरा....ते पण रॉकीसोबत हा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. माझ्या आतापर्यतच्या प्रवासामध्ये चाहत्यांचा मोठा वाटा आहे. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या शुभेच्छामुळे मी याठिकाणापर्यत आलो आहे. मला आशा आहे की, मी माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झालो आहे.

संजयनं त्याच्या दुसऱ्या एका व्टिटमध्ये आपली आई नर्गिस दत्त यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, तू मला खूप संयम शिकवला. माणुसकी काय असते हेही सांगितले. माफ कसं करायचं हेही सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजुतदारपणा काय असतो हेही मला तू शिकवले होते. मला माहिती आहे ही सगळी आयुष्याभराची पुंजी आहे. त्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. तू जे मला काय दिले त्याबद्दल मी तुझा मनपूर्वक आभारी आहे. असेही संजयनं त्या व्टिटमध्ये म्हटले आहे.