'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत संजय नार्वेकर यांची धडाकेबाज एण्ट्री

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
Sanjay Narvekar
Sanjay Narvekarfile image
Updated on

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. यामालिकेमध्ये लवकरच मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांची एण्ट्री होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत.(Sanjay Narvekar entry in the serial Tujhya Ishqacha Nadkhula)

तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजय नार्वेकर म्हणाले, ‘नाटक आणि सिनेमामध्ये प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. सिनेमा आणि नाटक सुरु असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. व्यक्तिरेखा खूप छान आहे आणि वेळेचं गणितही जमून आलं आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे असं मला वाटतं. इन्सपेक्टर गौतम साळवी हा एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याची जबर चर्चा आहे. मिश्किल आणि जिंदादील स्वभावाचा असा हा प्रामाणिक पोलिस अधिकारी. प्रत्येक गोष्टीचा ते बारकाईने आणि खोलात जाऊन अभ्यास करतात. पंचतंत्राच्या गोष्टींचा दाखला देत ते बोलतात. कितीही गंभीर केस असली तरी गौतमच्या सहवासात त्यांचं ओझं जाणवत नाही. माझ्या पद्धतीने मी या पात्रात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो आहे अशी भावना संजय नार्वेकर यांनी व्यक्त केली.’

Sanjay Narvekar
Indian Idol 12: आशिष कुलकर्णी बाहेर, शण्मुखप्रिया पुन्हा ट्रोल

गौतम साळवीच्या येण्याने मालिकेत नेमका काय धमाका होतो याची गोष्ट पुढच्या भागांमधून उलगडेलच. पण स्वाती आणि रघूचं आयुष्य नव्या वळणावर येणार हे मात्र नक्की.

Sanjay Narvekar
कलावंतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं मन हेलावून टाकणारं पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com