esakal | 'रोज बोलणारा मित्र गेलाय की काय, इतका डिस्टर्ब मी झालोय'

बोलून बातमी शोधा

Rohit Sardana
'रोज बोलणारा मित्र गेलाय की काय, इतका डिस्टर्ब मी झालोय'
sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता. रोहित सरदाना हे टीव्ही पत्रकारीतेच्या क्षेत्रातील एक मोठे नाव होते. त्यांच्या निधनाचं वृत्त हे सर्वांसाठीच आश्चर्याचा मोठा धक्का आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या भावना व्यक्त केल्या. 'माझ्याशी रोज बोलणारा, भेटणारा मित्र गेलाय की काय असं वाटावं इतका डिस्टर्ब झालोय मी,' अशा शब्दांत त्याने दु:ख व्यक्त केलं.

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट:

काही ऋणानुबंध शब्दात सांगताच येत नाहीत. त्यांना भेटीची गरज असतेच असंही नाही. ते फक्त जोडले जातात. मी या व्यक्तीचं वृत्तनिवेदन नेहमी पहायचो, ऐकायचो. घरी नसलो तर युट्यूबवर पहायचो. लाइव्ह चॅट सेशनमध्ये येणाऱ्या उर्मट आणि उद्धट प्रश्नांना हसून योग्य उत्तरं देणारा. स्पष्टवक्ता, अभ्सासू, हजरजबाबी रोहित सरदाना गेला. माझ्याशी रोज बोलणारा, भेटणारा मित्र गेलाय की काय असं वाटावं इतका डिस्टर्ब झालोय मी. मला फार फार वाईट वाटलंय.

हेही वाचा : एअरलिफ्ट केलेल्या रुग्णाची कहाणी ऐकून सोनू सूदच्या डोळ्यात तरळले अश्रू

रोहित सरदाना यांनी वेगवेगळ्या प्रसिद्ध वृत्त वाहिन्यांवर वृत्तनिवेदक म्हणून काम केलं होतं. स्टुडिओमधून अँकरिंग करताना थेट जनसामान्यांच्या प्रश्नाला हात घालून नेत्यांना बोलते करण्याची कला रोहित सरदाना यांना अवगत होती. त्यांचे अकाली निधन पत्रकारीतेच्या क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. झी मीडियामध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केलं होतं. 'ताल ठोक के' हा त्यांचा लोकप्रिय डिबेट शो होता.