एअरलिफ्ट केलेल्या रुग्णाची कहाणी ऐकून सोनू सूदच्या डोळ्यात तरळले अश्रू

"सोनू सूद हा आमच्यासाठी देवदूत आहे"; अशी भावना रुग्णाच्या कुटुंबीयांनी केली व्यक्त
Sonu Sood
Sonu Soodinstagram

गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात असंख्य गरीब मजुरांना, कामगारांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम अभिनेता सोनू सूदने केलं. गरीबांचा देवदूत बनलेल्या सोनूने त्याचं मदतकार्य विविध मार्गांनी अजूनही चालू ठेवलं आहे. आजही त्याला दरदिवसाला मदतीसाठी लाखो मेसेज आणि फोन कॉल येत असतात. पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या सोनूने खऱ्या आयुष्यात मात्र स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच सोनूने 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोच्या सेटवर हजेरी लावली होती. या शोदरम्यान त्याला एका महिलेचा व्हिडीओ दाखवण्यात आला होता. आजारी असलेल्या या महिलेला नागपूरहून हैदराबादला एअरलिफ्ट करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ पाहून सोनू सूदच्या डोळ्यात अश्रू तरळले.

भारती असं संबंधित महिलेचं नाव असून तिच्या कुटुंबीयांनी या व्हिडीओमध्ये सोनूचे आभार मानले. भारती यांची आई बोलताना भावूक झाल्या, तर सोनू सूद हा आमच्यासाठी देवदूत आहे, अशी भावना त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने बोलून दाखवली. हे पाहून सोनू सूदही भावूक झाला.

हेही वाचा : गरजूंसाठी अभिनेता बनला अ‍ॅम्ब्युलन्स ड्राइव्हर

१०० कोटी कमाईचा चित्रपट करण्यापेक्षा गरजूंची मदत करणं जास्त समाधानकारक असल्याची भावना सोनू सूदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली होती. "एका मध्यरात्री, अनेक फोन कॉल्स करून जर तुम्ही एका गरजवंताला ऑक्सिजन पुरवू शकता आणि काही लोकांचे प्राण वाचवू शकता, तर खरंच हे १०० कोटी रुपयांचा चित्रपट करण्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक समाधानकारक आहे", असं त्याने म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com