ShivKumar Sharma: 'पायावर डोकं ठेवावं असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं'|Santoor maestro Pandit Shivkumar Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santoor maestro Pandit Shivkumar Sharma passes away

ShivKumar Sharma: 'पायावर डोकं ठेवावं असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं'

Shivkumar Sharma: भारतीय संगीत क्षेत्रातील मोठं नाव असणारे प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्यानं (Indian Music) संगीतक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संगीतक्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांना वेगवेगळ्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आदरांजली वाहिली आहे. संतुरवादनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध (Entertainment News) करणारे व्यक्तिमत्व म्हणून पंडित शिवकुमार शर्मा यांची ओळख सातासमुद्रापार होती. जगभरातील वेगवेगळ्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी आपल्या संतुरवादनानं श्रोत्यांना जिंकुन घेतले होते. शिवकुमार शर्मा यांच्या जाण्याचे वृत्त कळताच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल देशपांडे - मला या क्षणाला काही सुचत नाही. संगीत क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते. अनेक वर्षांपासून त्यांचे संतुरवादन ऐकतो आहे. त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान होते. शिवजी यांचे नाव मोठे आहे. त्यांनी एक वेगळा विचार लोकांसमोर मांडला. मी मनापासून त्यांना आदरांजली वाहतो. मी त्यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकदा भेटलो. त्यांच्यासमवेत गायलो आहे. त्यांच्या पायावर डोकं ठेवायचो. ते माझी विचारपूस करायचे. माझ्या गाण्याचे त्यांना कौतुक होते. माझ्या चित्रपटाच्या वेळेस देखील त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा: प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन

संजीव अभ्यंकर - संगीताला घराघरात पोहचविण्याचे काम पंडिजींनी केलं. त्यांचे योगदान मोठे होते. संतुरवादनाची वेगळी शैली त्यांनी विकसित केली. प्रेक्षकांना काय हवे आहे हे त्यांना माहिती होते. संतुर वाद्याची गोडी श्रोत्यांना लावली. त्यांचे वादन अप्रतिम होते. संगीतक्षेत्रातील ते मोठे नाव होते.

हेही वाचा: मिले सूर मेरा तुम्हारा’ने पं. भीमसेन यांच्या गायकीशी जोडले सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन; भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे उदघाटन

Web Title: Santoor Maestro Pandit Shivkumar Sharma Passes Away Various Singer Musician Reactions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top