Sapna Choudhary:Sapna Choudhary: सपना चौधरीला कोर्टांचा दणका; फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sapna Choudhary: सपना चौधरीला कोर्टांचा दणका; फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल...

Sapna Choudhary: सपना चौधरीला कोर्टांचा दणका; फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल...

सपना चौधरीच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी आणि अन्य चार आरोपींविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. डान्स कार्यक्रमाच्या तिकिटासाठी लाखो रुपये उकळल्यानंतर कार्यक्रम न करून पैसे हडप केल्याचा आरोप तिच्यावर होता.

हेही वाचा: अखेर डान्सिंग क्वीन सपना चौधरी कोर्टाला शरण, फसवणूक चांगलीच भोवली...

यासंदर्भात लखनौ न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांच्या न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 406 आणि 420 अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. सुनावणीवेळी सपना चौधरी व अन्य आरोपी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने या खटल्याची पुढिल तारीख 12 डिसेंबर निश्चित केली आहे. सपना चौधरी व्यतिरिक्त इतर सहआरोपी जुनैद अहमद, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा: Diwali Celebration : पंतप्रधानानंतर सपना चौधरीनेही साजरी केली Indian Army सोबत दिवाळी...

न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले असतांना न्यायालयात आरोपपत्राचे वाचन करण्यात आले तेव्हा या सर्वांनी आरोप नाकारले आणि खटला पुढे चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानतंर न्यायालयाने 12 डिसेंबर ही पुढील तारीख दिली आहे.

हेही वाचा: Rajkumar Rao: अन् मी हिरोच्या रोलसाठी ऑडिशन देणंच बंद केलं! कारण बॉलिवूडमध्ये...

या आरोपाबद्दल सविस्तर माहिती अशी की 13 ऑक्टोबर 2018 रोजी लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत सपना चौधरी तिच्या सहकलाकारांचा कार्यक्रम होणार होता. याकार्यक्रमासाठी प्रति व्यक्ती ३०० रुपयांप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीटांची विक्री करण्यात आली.

कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोकांनी तिकीट काढले होते, मात्र सपना चौधरी रात्री 10 वाजेपर्यंत आलीच नाही. सपनाची वाट पाहून थकल्यानतंर लोकांनी यावर गोंधळ घातला. लोक तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी करत होते पण आयोजकांनी तसे केले नाही असा आरोप आहे. 14 ऑक्टोबर 2018 रोजी लखनौमधील आशियाना पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला होता.