Viral Video : सारा अली खानने केला टपोरी डान्स; युजर्स म्हणाले, ही मुलगी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan Dance News

Viral Video : सारा अली खानने केला टपोरी डान्स; युजर्स म्हणाले, ही मुलगी...

Sara Ali Khan Dance News बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सारा अली खान केवळ चित्रपटांमध्येच नाही तर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते. सारा तिचे मजेशीर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करीत असते. साराने नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) रस्त्यावर टपोरी स्टाईलमध्ये डान्स (Dance) करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सारा अली खानने कॉफी घेण्यापूर्वी आणि नंतरचे दोन मूड दाखवले आहेत. सारा अली खान स्टुडिओमध्ये हेअर स्टायलिस्टसोबत ‘बाहों में चले आओ’ गाण्यावर नाचताना (Dance) दिसत आहे. काही वेळातच सारा ‘टिंकू जिया’वर रस्त्यावर टपोरी डान्स करताना दिसते. साराचा हा व्हिडिओ पाहून कळते की ती कॉफीप्रेमी आहे. कॉफी मिळताच तिचा मूड आनंदी होतो.

‘अभिनय बनाम वास्तवाची सर्वांत अचूक आवृत्ती. जंगली आणि वेडी ही आमची मानसिकता आहे’, असे व्हिडिओ शेअर करताना सारा अली खानने लिहिले. व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली, ‘ही मुलगी वेडी आहे’. सारा अली खान (Sara Ali Khan) शेवटी अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’मध्ये दिसली होती. लोकांना हा चित्रपट आवडला होता.

हेही वाचा: Boycott Bollywood : बॉयकॉट बॉलिवूड हा राक्षस आपले रौद्र रूप दाखवतोय

व्हिडिओमध्ये सारा अली खान केशरी रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. हा व्हिडिओ शूटिंग सेटवर तयार होत असताना चित्रित केला आहे. सारा अली खान अनेक दिवसांपासून कार्तिक आर्यनला डेट करीत असल्याची चर्चा होती. २०१८ मध्ये कॉफी विथ करणमध्ये तिने कार्तिक आर्यनला आकर्षक अभिनेता म्हणून संबोधले होते. दोघांनी नंतर लव्ह आज कलमध्ये एकत्र कास्ट करण्यात आले. मात्र, २०२० मध्ये दोघं वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या.

साराचे आगामी चित्रपट

लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात सारा विक्की कौशलसोबत दिसणार आहे. आणखी एका चित्रपटात सारा विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगसोबत दिसणार आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश तौरानी करीत आहे.

Web Title: Sara Ali Khan Actress Dance Road Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..