
Rakhi- Sara Video: अरे हे चाललयं काय? वॉशरुममध्ये दोघी एकट्याच!राखीनं साराला उचललं अन् पुढे....
Rakhi Sawant And Sara Ali Khan Video: बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचा विकी कौशलसोबतच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे काही गाणे नुकतेच रिलिज झाले असून हे दोघही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतच इंटरनॅशनल फिल्म अकादमी अवॉर्ड्स अबू धाबी येथे दोघ पोहचले होते. येथेही सारा अन् विकीनं त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काही कमी केली नाही.

आधी विकी आणि राखीचा शीला की जवानी या गाण्यावरील डान्स व्हायरल झाला तर आता सारा आणि राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राखी सारासोबत भांडतांना दिसत आहे. सारा आणि राखी या एक सारख्याच आहेत. दोघीही खुप बोलतात आणि सारखाच ड्रामा देखील करतात.
पण नुकतचं दोघात असं काही घडलं की या दोन्ही अभिनेत्री एकमेकांना भिडल्या. त्याचं कारण म्हणजे दोघींनीही सारखेच कपडे परिधान केले होते. अवॉर्ड फंक्शनला दोघींनी लाल रंगाचा गाउन घातला होता. त्यामुळे त्या एकमेकांना भिडल्या तेव्हा कोणीही कल्पना केली नसेल असे काही घडले.
सारा खूप चिडलेली असताना, राखीचा आत्मविश्वास पाहून ती थोडी घाबरते. राखीला म्हणते की तु देखील लालच रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यावेळी राखी म्हणते की तिचा खुप ड्रेस चांगला आहे आणि ती लाल मिरचीसारखी दिसत आहे. सारा म्हणाली की ती लाल चेरी दिसत आहे. यावर राखीने कमेंट केली की ती केकसारखी दिसत आहे आणि सारा त्या केकवरील चेरी आहे.
जेव्हा साराला काही समजत नाही तेव्हा ती रडल्यासारखा चेहरा करते आणि राखीला म्हणते, 'तू पापी आहेस'. हे ऐकून राखी म्हणते की मला पाप लागत असेल तर लागू दे, आता मी पण डान्स करेन, पाप लागलं तर 5 किलो, 10 किलो…. यानंतर दोघेही साराच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील 'बेबी तुझे पाप लगागा...' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
नाचत असताना राखीने साराला आपल्या मिठीत उचलले. हा व्हिडिओ साराने तिच्या अकाउंटला पोस्ट केला आहे. आता नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि राखी सावंत काहीही करु शकते असं म्हणत आहे.
सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हा व्हिडिओ शुट केला आहे. हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.