Vanita Kharat: शरम वाटते तुमची.. दिल्लीत कुस्तीपटूंच्या कारवाईवर हास्यजत्रा फेम वनिता खरात थेट बोलली

पोलिसांनी या कुस्तीपटूंना रस्त्यावर फरफटत नेलं. अखेर या प्रकरणावर हास्यजत्रा फेम वनिता खरात मोजकंच पण थेट म्हणाली.
Vanita Kharat, Vanita Kharat news, maharashtrachi hasyajatra, delhi wrestler protest
Vanita Kharat, Vanita Kharat news, maharashtrachi hasyajatra, delhi wrestler protest SAKAL

Vanita Kharat on Wrestler Protest News: दिल्ली पोलिसांनी बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर ते रस्त्यावरच धरणे धरून बसले.

यानंतर दिल्ली पोलिस आणि पैलवानांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला.

अगदी पोलिसांनी या कुस्तीपटूंना रस्त्यावर फरफटत नेलं. अखेर या प्रकरणावर हास्यजत्रा फेम वनिता खरात मोजकंच पण थेट म्हणाली.

(Vanita Kharat of the maharashtrachi hasyajatra spoke directly on the actions of wrestlers in Delhi)

Vanita Kharat, Vanita Kharat news, maharashtrachi hasyajatra, delhi wrestler protest
Sameer Wankhede Case: मी शेंगा खाल्ल्या नाहीत.. नवऱ्याच्या प्रकरणावरुन क्रांती पुन्हा बरसली

वनिता खरातने इंडियन एक्सप्रेसच्या बातमीचा फोटो शेयर करत त्यावर दुःखी ईमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय या संपूर्ण प्रकरणावर वनिताने एक कविता पोस्ट केलीय. त्या कवितेत वनिताला जे सांगायचं ते तिने मोजक्या शब्दात मांडलं आहे.

हाकीम को इक चिठ्ठी लाखो सब के सब, और इसमें बस इतना लिखना, लानत है.. अशी कविता वनिता खरातने पोस्ट केलीय. वरुण आनंद यांनी ही कविता लिहिली आहे.

vanita kharat
vanita kharat Instagram
vanita kharat
vanita kharatInstagram

याशिवाय स्वरा भास्करने सुद्धा या प्रकरणावर विरोधाभास दाखवलाय. स्वरा लिहिते.. भारत अशीच प्रगती करत राहील.. आपण कशासाठी मतदान केले आहे ते येथे आहे!

अशी पोस्ट करत स्वराने भीषण परिस्थिती उलगडली आहे. स्वराच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी स्वराने केलेल्या ट्विटचं समर्थन केलंय. तर अनेकांनी स्वरावर टीकाही केलीय.

Vanita Kharat, Vanita Kharat news, maharashtrachi hasyajatra, delhi wrestler protest
Adipurush Ram Siya Ram: सीतेच्या विरहात व्याकुळ श्रीराम.. आदिपुरुष मधलं नवं गाणं ऐकून डोळ्यात येईल पाणी

काय आहे प्रकरण जाणून घेऊ?

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आत ट्विट करून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याची मागणी केली.

दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय महिलाकुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या.

मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई झालीय. याशिवाय जंतर-मंतरवरील तंबू उखडण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com