साराला करायचाय 'कुछ कुछ होता है' चा रिमेक.. चाहते म्हणाले, कृपया.. Sara Ali Khan wants to star in Kuch Kuch Hota Hai remake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kuch kuch hota hai remake

साराला करायचाय 'कुछ कुछ होता है' चा रिमेक.. चाहते म्हणाले, कृपया..

सारा अली खाननं (Sara Ali Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पणापासूनच आपलं नाव कमावण्यास सुरुवात केली. तिचं दिसणं,तिचा अभिनय,नृत्य अशा एकंदरीत सर्वच गोष्टींवर तिचे चाहते फिदा आहेत. २०२० मध्ये कार्तिक आर्यनसोबत आलेला तिचा 'लव्ह आज कल २' हा सिनेमा फारसा चालला नसला तरी त्यातली सारा मात्र भाव खाऊन गेली. 'अतरंगी रे' आणि 'कुली नं वन' हे तिचे दोन सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी फारशी कमाल दाखवली नसली तरी या सिनेमातील गाण्यांवर थिरकलेली सारा सर्वांनाच अधिक भावली. आता तिला कुछ कुछ होता है (kuch kuch hota hai) या चित्रपटात काम करायचे आहे. लोकप्रिय चित्रपटाचा रिमेक व्हावा अशी इच्छा तिने एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा: Maharashtra Shahir : अंकुश चौधरी साकारणार 'शाहीर साबळे'.. पाहा झलक..

1998 मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' (kuch kuch hota hai remake) या चित्रपटाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. करण जोहर (karan johar) लिखित दिग्दर्शित हा या चित्रपटाने तरुणांनाच नाही तर सर्वांनाच भुरळ घातली. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. धर्मा प्रॉडक्शन निर्मित 'कुछ कुछ होता है'चे शूटिंग भारत, स्कॉटलंड आणि मॉरिशसमध्ये झाले होते. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात अनुपम खेर, फरीदा जलाल, रीमा लागू, अर्चना पूरण सिंग, हिमानी शिवपुरी, जॉनी लीव्हर, नीलम कोठारी, सना सईद, परजान दस्तूर अशा अनेक दिग्गजांनी महत्वाच्या भूमिका पार पडल्या आहेत.

हेही वाचा: PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..

एका माध्यमाने सारा अली खानची मुलाखत घेतली. यावेळी तिला जुन्या चित्रपटांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी सारा म्हणाली, मी जान्हवी कपूर (janhavi kapoor) आणि विजय देवरकोंडा (vijay devarkonda) आम्हा तिघांना एकत्र कुछ कुछ होता है मध्ये काम करायचं आहे. करण जोहरने जर आम्हाला घेऊन याच चित्रपटाचा रिमेक केला तर खूप चांगलं होईल. किंबहुना ही संकल्पना तुम्ही आताच करणच्या कानावर घाला. मला 98.3 टक्के खात्री आहे की ते हे मान्य करतील. त्यामुळे, मला वाटते की हा चित्रपट आम्हीच केला पाहिजे."

या तिच्या इच्छेवर चाहते मात्र नाराज झाले आहेत. तू दुसरं काहीही कर पण त्या 'कुछ कुछ होता है' ची वाट नको लावूस अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. तर दुसरा म्हणतो, असं काही करण्याचा प्रयत्नही करू नकोस. थोडक्यात काय तर साराची या संकल्पनेवर चाहत्यांनी नापसंती दर्शवली आहे.

Web Title: Sara Ali Khan Wants To Star In Kuch Kuch Hota Hai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top