सारा अली खानचा वाहनचालकाला कोरोना; तर साराचा रिपोर्ट आला...

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 14 जुलै 2020

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सारा प्रवास करीत होती. तिने मुंबईतल्या आनंद एल. राय यांच्या ऑफिसला भेट दिली होती.

मुंबई : 'केदारनाथ', 'लव आज कल' अशा हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री  सारा अली खानच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. सारा आणि तिच्या कुटुंबीयांची तसेच अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही माहिती साराने आपल्या  इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितली आहे. त्या वाहनचालकाला ताबतोड रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच महापालिककडून साराचे संपूर्ण घर तसेच आजूबाजूचा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना

तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "मला तुम्हा सगळ्यांना सांगायचे आहे की आमच्या ड्रायव्हरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याबद्दल बीएमसीला तातडीने कळवण्यात आले आणि त्याला लगेचच क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारांसाठी हलविण्यात आले. माझे संपूर्ण कुटुंब, घरातील इतर कर्मचारी सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरी खबरदारी म्हणून आवश्यक काळजी घेतली जाईल. बीएमसीच्या सर्व सहकार्यासाठी व मार्गदर्शनासाठी मी व माझ्या कुटुंबियांकडून बीएमसीचे मनापासून आभार मानते. तुम्ही सर्वही सुरक्षित रहा आणि काळजी घ्या."

ऐन लॉकडाऊनमध्ये सिडकोने उगारला कारवाईचा बडगा; आमदार म्हात्रेंनी केली कारवाई थांबवण्याची मागणी...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सारा प्रवास करीत होती. तिने मुंबईतल्या आनंद एल. राय यांच्या ऑफिसला भेट दिली होती.  'अतरंगी रे' या सिनेमाचे ते दिग्दर्शक आहेत. सारा त्या चित्रपटामध्ये काम करीत आहे तसेच साराचा कुली नं. 1 हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. यामध्ये वरुण धवन तिचा नायक आहे. शिवाय एकदा सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान देखील एकत्र सायकल चालवताना दिसले होते.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sara ali khans driver tested positive for covid19 and sara's report is