Saumya Tandon: 'मी जोरजोरात किंचाळत होते..', अभिनेत्री सौम्या टंडन सोबत उज्जैनमध्ये अंगावर काटा आणणारी घटना Tv Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saumya Tandon

Saumya Tandon: 'मी जोरजोरात किंचाळत होते..', अभिनेत्री सौम्या टंडन सोबत उज्जैनमध्ये अंगावर काटा आणणारी घटना

Saumya Tandon: 'भाभीजी घर पर है' शो मुळे घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सौम्या टंडननं एक हैराण करणारा किस्सा शेअर केला आहे. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की उज्जैनमध्ये एका मुलानं तिच्या भांगेत जबरदस्तीनं कुंकू भरलं होतं. चला जाणून घेऊया ती अंगावर काटा आणणारी घटना.

टी.व्ही अभिनेत्री सौम्या टंडनला कोणत्याही स्वतंत्र ओळखीची गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून ती अभिनयापासून अंतर राखून आहे. पण असं असलं तरी लाइमलाइटमध्ये मात्र ती नेहमीच दिसते.

त्यातच आता अभिनेत्रीनं एक भीतीदायक किस्सा शेअर केला आहे. तिनं एका मुलाखतीत उज्जैनमध्ये ती ईव्ह-टीजिंगची शिकार झाली होती असा खुलासा केला आहे.(Saumya Tandon bhabiji ghar par hai fame opens up on facing eve teasing in ujjain)

सौम्या टंडन म्हणाली,''थंडीच्या काळोख्या रात्री एके दिवशी ती तिच्या घरी जात होती तेव्हाची ही घटना. तेव्हा एका मुलानं रस्त्यात माझ्यासमोर चालता चालता त्याची बाईक आणून थांबवली आणि माझ्या भांगेत कुंकू भरलं. या अचानक झालेल्या घटनेनं मी पूरती घाबरली होती''.

यानंतर सौम्यानं आणखी एक भीतीनं थरकाप उडवणारा किस्सा सांगितला.

सौम्या म्हणाली,एकदा ती शाळेतून घरी परतत होती.ती सायकल चालवत होती..यादरम्यान एका मुलांन तिला ओव्हरटेक केलं.ज्यामुळे सौम्या रस्त्यावर खूप वाईट पद्धतीनं पडली. या घटनेमुळे अभिनेत्रीच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. आणि पायाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं होतं.

अपघाताविषयी बोलताना सौम्या म्हणाली,'' ती रस्त्यावर जोरजोरात किंचाळत होती,रडत होती पण कोणीच तेव्हा तिची मदत करायला पुढे आलं नाही''.

यामुळे सौम्या जितके दिवस उज्जैनमध्ये राहिली तेव्हा तिला स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागलं. तिथे कधी मुलांनी भर रस्त्यात तिचा पाठलाग करत तिला छेडलं तर कधी भिंतींवर तिचं नाव लिहित घाणेरड्या कमेंट्स केल्या.

सौम्या टंडनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तिनं २००८ मध्ये अफगाणी मालिका 'खुशी' मधनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर काही शो तिनं होस्ट केले. करिना कपूर -शाहिद कपूरच्या 'जब वी मेट' या सुपरहिट सिनेमातही सौम्यानं बेबोच्या बहिणीची भूमिका केली होती.

पण खरी लोकप्रियता सौम्याला 'भाभीजी घर पर है' या शो मुळे मिळाली. या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर सौम्या आता नवीन चांगल्या प्रोजेक्टसची वाट पाहतेय.