esakal | 'जुनी भुतं मागे सोडून पुढं जायचं की नाही'?
sakal

बोलून बातमी शोधा

sayani said Hope old demons are left behind adopt new positive ways of life

सयानी ही सध्या आपल्या कुटूंबासमवेत कोलकाता येथे दिवाळी साजरी करत आहे. ब-याच कालावधीनंतर तिला परिवाराबरोबर दिवाळीचा आनंद घेण्याची संधी मिळाली आहे. तिने 9 महिन्यानंतर आपल्या आईची भेट घेतली आहे.

'जुनी भुतं मागे सोडून पुढं जायचं की नाही'?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मॉडेल आणि अभिनेत्री सयानी गुप्ता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तनिष्काच्या जाहिरातींवरुन वादाला सुरुवात झाली होती. त्यापैकी एक जाहिरात मागे घेत नाही तोच दुस-या जाहिरातीबाबत सोशल मीडियावर टीका होऊ लागली. याचा फटका सयानीला बसला. तिला नेटक-यांच्या तिखट प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं. त्यावरुन तिने प्रेक्षकांना काही आवाहन केलं आहे.

सयानीने दिवाळी निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तिने लोकांच्या मानसिकतेवर मत व्यक्त केलं आहे. महिन्याभरात दुस-यांदा आपली जाहिरात मागे घेण्याची वेळ तनिष्कवर आली आहे. त्याचे झाले असे की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्कने एक नवी जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यात नीना गुप्ता, सयानी गुप्ता, अलाया एफ आणि निम्रत कौर अशा अभिनेत्रींचा समावेश आहे. या दिवाळीत  फटाके वाजवण्याऐवजी काही वेळ आपल्या आईसह घालवणे ती पसंत करेल, असे या जाहिरातीत सयानी गुप्ता म्हणते.

यंदा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करा, असे आवाहनही ती करते. दिवाळला फटाके वाजवू नका, नेमका हा जाहिरातीत दिलेला संदेश लोकांना खटकल्याने त्यावरून सोशल मीडियावर वाद सुरु झाला. हिंदूंनी त्यांचा सण कसा साजरा करावा, हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल करत नेटक-यांनी तनिष्कच्या जाहिरातीला विरोध केला.

हे ही वाचा: मेगास्टार चिरंजीवी कोरोना व्हायरसने संक्रमित नाहीत, पहिल्या टेस्टमध्ये कोरोना पॉझिटीव्ह येण्याचं 'हे' होतं कारण  

अशावेळी आपली भूमिका मांडताना सयानी म्हणते, प्रत्येकाने मानवी मुल्यांचा आदर राखणे गरजेचं आहे. सणाच्या निमित्ताने आपल्याला अनेकांशी संवाद साधायची संधी मिळते. अशावेळी आपण व्यक्त होताना कुणाला दुखावत तर नाही ना याची काळजी घ्यायला हवी. 

'कोणे एकेकाळी तो काय होता, आता काय झाला'

सयानी ही सध्या आपल्या कुटूंबासमवेत कोलकाता येथे दिवाळी साजरी करत आहे. ब-याच कालावधीनंतर तिला परिवाराबरोबर दिवाळीचा आनंद घेण्याची संधी मिळाली आहे. तिने 9 महिन्यानंतर आपल्या आईची भेट घेतली आहे. कोरोनामुळे तिला परिवारापासून लांब राहावे लागले होते. दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांशी संवाद साधताना सयानी म्हणाली, मला वाटतं लोकांनी त्यांच्या मानगुटीवर असलेलं जुन्या भुतांना दुर सारायला हवे. ही वेळ आता सकारात्मक विचार बरोबर घेऊन वाटचाल करण्याची आहे. ते आपल्याला पुढच्या प्रवासासाठी साथ देणार आहेत हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे.

कोणं म्हणतं ‘लक्ष्मी’ प्रसन्न होत नाही,जेव्हा होते तेव्हा...

आपण जितक्या उत्साहाने सकारात्मक विचारांना आपलेसं करु, त्याचा फायदा आपल्याला पुढील आयुष्यासाठी होणार आहे. दरवेळी दुस-याचा तिरस्कार करणे, त्यांच्यावर टीका करणे हे बरोबर नाही. आपल्याला जास्तीत जास्त सोशिक व्हायला हवं. हे विचार जरी दिवाळीच्या निमित्ताने अंगीकारता आले तरी पुरेसं आहे. असेही सयानी म्हणाली.

गेल्या काही दिवसांपूर्वी तनिष्कच्या जाहिरातीत एक आंतरधार्मिक विवाह दाखवून त्यात डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम दाखविण्यात आला होता. त्यावरुन वादाला सुरुवात झाली होती. अनेकांनी याप्रकारची जाहिरात ही लव जिहादचा पुरस्कार करत असल्याची टीका केली.