शेखर सुमन यांनी केला त्यांच्या मुलाबाबत मोठा खुलासा; जाणून घ्या काय म्हणाले ते...

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 28 June 2020

अभिनेता शेखर सुमन यांनी स्वतः च आपला मुलगा अध्ययनबाबत एक खुलासा केला आहे. अध्ययन हा नैराश्याने ग्रासलेला आहे. त्याने स्वतः माझ्याकडे ही बाब बोलून दाखविली.

मुंबई : अभिनेता शेखर सुमन यांनी स्वतः च आपला मुलगा अध्ययनबाबत एक खुलासा केला आहे. अध्ययन हा नैराश्याने ग्रासलेला आहे. त्याने स्वतः माझ्याकडे ही बाब बोलून दाखविली. त्यामुळे मी माझ्या मुलाला एकटे सोडत नाही. प्रत्येक वेळी अध्ययन सोबत कोणी ना कोणी घरातील एक सदस्य सतत असतो, असे शेखर सुमन यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. 

कोरोनावर उपचाराची ट्रेनिंग घेतली 1 लाख डॉक्टरांनी, नोंदणी फक्त 1500 जणांची...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर शेखर यांनी या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी अध्ययनबद्दल खुलासा केला. अध्ययनने एका चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. पण दुर्दैवाने त्या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही.

सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाका प्रकरणात चौकशीचे आदेश; परिवहन विभागात मोठी खळबळ...

सुशांतच्या बाबतीत शेखर म्हणाले की , मी सुशांतच्या वडिलांचे दुःख समजू शकतो. तो मला मुलाप्रमाणे होता. कारण त्याच्याप्रमाणेच माझा मुलगाही तणावग्रस्त आहे. इंडस्ट्रीने त्याच्या पुढे अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. एकदा अध्ययनने मला त्याच्या मनातील आत्महत्येचा विचार बोलून दाखविला. 

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

एक पिता म्हणून शेखर घाबरलेले आहेत. म्हणून ते आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाहीत. शेखर व त्यांच्या कुटुंबीयांनी अध्ययनला समजावले आहे की, तू नैराश्याशी खंबीरपणे लढ, अध्ययनने मनाने मजबूत राहावे म्हणून घरचे त्याला प्रोत्साहित करीत असतात. सुशांतच्या अचानक निधनाने अध्ययनही अजून तणावग्रस्त झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior actor shekhar suman said about his son as he is in depression