कोरोनावर उपचाराची ट्रेनिंग घेतली 1 लाख डॉक्टरांनी, नोंदणी फक्त 1500 जणांची...

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 28 जून 2020

  • महाराष्ट्रातील एक लाख आयुष डॉक्टरांनी कोरोनावरील उपचारासाठी ट्रेनिंग घेतले आहे,
  • पण आत्तापर्यंत केवळ पंधराशे डॉक्टरांनी कोरोनावरील उपचारासाठी आपली नोंदणी केली आहे.

 

मुंबई: महाराष्ट्रातील एक लाख आयुष डॉक्टरांनी कोरोनावरील उपचारासाठी ट्रेनिंग घेतले आहे, पण आत्तापर्यंत केवळ पंधराशे डॉक्टरांनी कोरोनावरील उपचारासाठी आपली नोंदणी केली आहे. पण सध्या केवळ पंधराशे आयुष डॉक्टरच कोरोनावरील उपचारात आहेत, त्यामुळे या डॉक्टरांविरुद्ध कारवाई न केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य आरोग्य विभागावर टीका केली आहे. 

काय सांगता? ऑनलाईन वर्गच झाला हॅक; सायबर गुन्हेगारांचा ऑनलाईन शिक्षणावरही डोळा...

कोरोना रोखण्यासाठी आयुष डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय एप्रिलमध्ये झाला. आत्तापर्यंत एकंदर पंधराशे आयुष डॉक्टरच हे काम करीत आहेत, त्यातील पाचशे मुंबईतील कोरोना उपचार केंद्रात आहेत. ते लक्षण नसलेल्या तसेच मोठ्या प्रमाणावक बाधा नसलेल्या रुग्णांवर उपचार करीत आहेत.  
महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे 90 हजार डॉक्टरांची नोंदणी आहे. मात्र 55 वर्षावरील डॉक्टर कोरोनावरील उपचार करणार नाहीत असे ठरले आहे. त्यामुळे डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे असे लक्षात आले होते. त्यामुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या मदतीने एप्रिलमध्ये कोरोना उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यात कोरोना रुग्णांवर उपचार कसे करावेत याचे व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाईन परिक्षेनंतर उत्तीर्ण डॉक्टरांना प्रमाणपत्र देण्यात आले.

अरे बापरे... एका रात्रीत  मुंबईत आढळलेत अजस्त्र अजगर

एक लाख आयुष डॉक्टरांनी कोरोनाची परिक्षा दिली. त्यांची नावे डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्यूकेशन अँड रिचर्सला पाठवण्यात आली. कोरोनावरील उपचारासाठी 25 हजार डॉक्टरांची गरज लागेल, त्यावेळी आयुष डॉक्टरांची मदत घेण्याची सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केली होती. गेल्या महिन्यात राज्य सरकारने अॅलोपथी डॉक्टरांसाठी पंधरा दिवसांची कोरोना उपचार बंधनकारक असेल, असे सांगितले होते. त्यामुळे अनेक अॅलोपथी डॉक्टर नाराज झाले असे सांगितले जात आहे. कोरोना उपचारात सहभागी न झाल्याबद्दल अॅलोपथी ढॉक्टरांना नोटीस देण्यात आली, मग आयुष डॉक्टरांना का देण्यात आली नाही, इंडियन मेडिकल संघटनेने केली. त्याचवेळी आम्ही अनेकदा आयुष डॉक्टरांची मदत घेण्याची सूचना केली होती असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1500 of 1 lakh ayush doctors reported for covid 19 duty in maharashtra