Movie Release : आज सात चित्रपट आमने-सामने, काटेकी टक्कर..

आज २९ एप्रिल रोजी सात चित्रपट रिलीज झाले आहेत. हे सातही चित्रपट दर्जेदार असून मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
seven movies released today
seven movies released today sakal

करोनाचे भय अजून सरले नसले तरी अनलॉक झाल्यानंतर मनोरंजन विश्वात आनंदाचे वातावरण आहे. चित्रपट क्षेत्रातही एकामागोमाग एक चित्रपटांचा सपाटा चालूच आहे. आजचा दिवस तर ब्लॉकबस्टर फ्रायडे (Blockbuster Friday ) म्हणावा लागेल. कारण आज एकाच दिवशी विविध भाषेतील सात चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. प्रेक्षकांसाठी जरी ही पर्वणी असली तरी यामुळे चित्रपटांमध्ये काटेकी टक्कर निर्माण झाली आहे. या सात चित्रपटांमध्ये दोन बॉलिवूड, एक मराठी आणि चार इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. त्याबाबत थोडक्यात माहिती..

seven movies released today
राडा, लफडी आणि चिक्कार मनोरंजन घेऊन 'बिग बॉस मराठी' पुन्हा येतंय..

१. हिरोपंती 2 : (heropanti 2) अभिनेता टायगर श्रॉफ (tiger shroff) आणि तारा सुतारिया (tara sutaria) यांचा हिरोपंती 2 हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अहमद खान यांनी दिग्दर्शन केले असून निर्मिती साजिद नाडियादवाला यांची आहे.

२. रनवे 34 : (runway 34) अभिनेता अजय देवगणची (ajay devgan) प्रमुख भूमिका असलेला ‘रनवे 34’ देखील या चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह हे तीन कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या सत्य घटनेवर आधारित आहे. खराब हवामान आणि कमी दृश्यमानता असूनही पायलटने धोका पत्करून विमान कशाप्रकारे विमानतळावर उतरवले याचा थरार चित्रपटात दाखवला आहे.

seven movies released today
Photo : विमानतळावर 'चंद्रमुखी'चीच हवा.. पाहा खास फोटो..

३. चंद्रमुखी : (chandramukhi) विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक (prasad oak) यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर (chinmay mandlekar) यांची आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvikar) प्रमुख भूमिकेत असून अजय -अतुल यांचे संगीत आहे.

४. आचार्य : अभिनेता राम चरण (ram charan), वडील चिरंजीवी (chiranjivi) यांनी एकत्र अभिनय केलेला हा पहिला चित्रपट आहे. कोरतला शिव यांनी दिग्दर्शन केले असून
चित्रपटाची कथा एका मध्यमवयीन नक्षलवादी-समाजसुधारकावर आधारित आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, सोनू सूद, जिशु सेनगुप्ता, वेनेला किशोर, सौरव लोकेश, पोसनी कृष्णा मुरली, तनिकेला भरणी, अजय, संगीता, बॅनर्जी हे कलाकारही आहेत.

#चंद्रमुखी च्या लावणी आन् सौंदर्याची बातच न्यारी,
पाहण्यासाठी आता गाठा की ओ तिकीट बारी!@TheChandramukhi@AmrutaOfficialK #AdvanceBooking https://t.co/xZbjQLVQXK @AjayAtulOnline @prasadoak17 @adinathkothare @Mrunmayeeee pic.twitter.com/GTLkgAgGKi
— Chandramukhi (@TheChandramukhi) April 28, 2022

५. नी मै सास कुटनी: हा पंजाबी बोलीभाषेतील चित्रपट आहे. परवीन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट सासू सुनेच्या आंबट गोड नात्यावर भाष्य करतो.
६. रावण : रावण हा बंगाली चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन एमएन राज यांनी केले आहे. या चित्रपटात प्रीतम मंडल, जीत, तनुश्री चक्रवर्ती हे कलाकार आहेत.
७. मकल : सत्यन अंतिकाड दिग्दर्शित मकल हा एक मल्याळम चित्रपट आहे. या चित्रपटात जयराम, सिद्दीकी, नसलेन, मीरा नायर आणि मीरा जस्मिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com