Eid 2023: 'तू मुसलमान कधीपासून झाला..', ईदच्या दिवशीच प्रसिद्ध गायक शानवरनं सोशल मीडियावर राडा..जाणून घ्या प्रकरण

सोशल मीडियावर शाननं ईदच्या शुभेच्छा देताना केलेली एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकली अन् त्यांनी गायकाची शाळा घेतली.
Singer Shaan
Singer ShaanInstagram

Shaan: भारतात सर्वत्र ईदचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या खास क्षणी बॉलीवूडच्या अनेक बड्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. बी-टाऊनचा प्रसिद्ध गायक शाननं देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. पण त्याची पोस्ट पाहता पाहता व्हायरल झाली आहे. काही लोकांना त्याची ही पोस्ट खटकली आहे आणि ते त्याला प्रश्न विचारु लागलेयत,'तू मुसलमान कधीपासून झाला?'

शाननं जो फोटो शेअर केला आहे,त्यात तो डोक्यावर टोपी घालून नमाज पढताना दिसत आहे. आता समोर आलं आहे की त्यानं प्रत्यक्षात तसं केलेलं नाही तर तो फोटो आणि लूक एका व्हिडीओ शूट दरम्यानचा आहे.

ही गोष्ट स्वतः शानला सांगावी लागली कारण त्याच्या पोस्टवरनं काही लोक त्याला धर्माची शिकवण देऊ लागले होते. शाननं देखील या लोकांना कडक उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली आहे. (Shaan Eid 2023 celebration post controversy netizens comment)

Singer Shaan
Priyanka Chopra: पहिला सिनेमा ऑफर झाला तेव्हा नाराजच होती प्रियंका.. निर्मात्यासमोर ढसाढसा रडत म्हणाली होती..

शानने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे, ''तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ईद मुबारक..'' यानंतर शाननं फोटोविषयी स्पष्टिकरण देताना लिहिलं आहे की,''आज ईद आहे. मी ३ वर्षापूर्वी एक व्हिडीओ केला होता.पलाश मुच्छलसाठी मी तो व्हिडीओ केला होता. 'करम कर दे..' असं त्याचं नाव होतं. त्यामध्ये असा लूक होता.तेव्हा मी विचार केला की ईद या सणासाठी पोस्ट करताना हा फोटो एकदम योग्य आहे...बस एवढीशी गोष्ट घडली अन्..''

शाननं पुढे लोकांची बोलती बंद करत लिहिलं आहे,''तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून मी हैराण आहे..मी हिंदू आहे..मी ब्राह्मण आहे..मला लहानपणापासून एकमेकांचे सण साजरे करण्याची शिकवण मिळाली आहे''.

'' प्रत्येक धर्माचा सम्मान करायला मला शिकवलं आहे. हीच माझी विचारसरणी आहे आणि ही प्रत्येक हिंदुस्थानी माणसाची विचारसरणी असायला हवी. बाकी तुमची विचार करण्याची पद्धत तुमच्याकडेच राहू दे''. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये शानने 'जय परशुराम' देखील लिहिले आहे.

Singer Shaan
Sonalee Kulkarni: सौंदर्याचं दुसरं नाव..सोनाली..

शानने ही पोस्ट शेअर केली तेव्हा एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं होतं,'हा मुसलमान कधीपासून झाला..', मला वाटलं की हा बंगाली आहे'. तर एकानं लिहिलं की,'शुभेच्छा द्यायच्या फक्त.. हे करायची गरज काय होती. कोणत्या मुसलमानानं कधी डोक्यावर टिळा लावून शुभेच्छा दिल्यात का कधी?उलट असं करून हा चुकलाच आहे'.

काही लोकांनी तर मुद्दामहून शानला जय परशुराम आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com