esakal | शशी थरुर यांच्या गाण्याला जावेद अख्तरांचा टोला; शबाना आझमींकडून ट्रोलर्सना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

javed shabana shashi

शशी थरुरांच्या गाण्याला जावेद अख्तरांचा टोला; शबाना आझमींकडून ट्रोलर्सना उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

काँग्रेसचे खासदार शशी थरुर Shashi Tharoor हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शशी थरुर यांनी नुकतंच ट्विटरवर त्यांनी एका कार्यक्रमात गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. श्रीनगरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यापैकी कवी आणि गीतकार जावेद अख्तर Javed akhtar यांच्या ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

श्रीनगरमधील दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात शशी थरूर यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात उपस्थितांनी आग्रह केल्याने गाणं गायल्याचं त्यांनी सांगितलं. अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये ते 'एक अजनबी हसीना से..' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर जावेद अख्तर यांनी ट्विट करत म्हटलं, 'अरे वाह, आपल्याकडे हिंदीतही असंच एक गाणं आहे.' शशी थरुर त्यांच्या इंग्रजीसाठी विशेष ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या तोंडून हिंदीतील गाणं ऐकून जावेद अख्तर यांनी मजेशीरपणे ती कमेंट केली.

हेही वाचा: भारती सिंगने १५ किलो वजन केलं कमी; सांगितला खास डाएट प्लान

हेही वाचा: सचिन-सुप्रिया पिळगावकरांची गोवा ट्रिप; पहा फोटो

अख्तरांच्या ट्रोलिंगला शबाना आझमींचं उत्तर

जावेद अख्तरांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. हिंदी गाणं गायल्याबद्दल त्यांचं कौतुक न करता अशी खिल्ली उडवणं योग्य नाही, असं नेटकऱ्यांनी अख्तरांना म्हटलं. त्यावर जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आझमी यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. शशी थरुर यांच्या गाण्यावर त्यांनी कौतुकाचे दोन शब्द लिहिले आणि पुढे ट्रोलर्सना म्हटलं, 'जे लोक ट्रोल करत आहेत, त्यांनी शांत रहा. शशी थरुर हे आमचे चांगले मित्र आहेत आणि जावेद यांनी ती कमेंट गमतीशीरपणे केली आहे.'

शशी थरुर यांच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

loading image
go to top