Shah Rukh Khan : ॲक्शन चित्रपट बदलणार ‘किंग ऑफ रोमान्स’चे नशीब? शाहरुख चालतोय सलमानच्या वाटेवर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan News

Shah Rukh Khan : ॲक्शन चित्रपट बदलणार ‘किंग ऑफ रोमान्स’चे नशीब? शाहरुख सलमानच्या वाटेवर!

Shah Rukh Khan News ‘ब्रह्मास्त्र’मधील वानरास्त्रची व्यक्तिरेखा असो किंवा जवान आणि पठाण चित्रपटांमध्ये केलेली दमदार ॲक्शन असो. टायगर ३ मध्‍ये सलमान खानसोबतची जोडी असो किंवा अयान मुखर्जीचा आगामी चित्रपट असो, शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) लक्ष आता ॲक्शन चित्रपट आणि ॲक्शन पात्रांवर केंद्रित आहे. त्यामुळे शाहरुख खानने आता सलमान खानचा मार्ग अवलंबला आहे का, असा प्रश्न पडतो.

२००९ मध्ये आलेल्या वाँटेड चित्रपटाला सलमान खानचा कमबॅक चित्रपट म्हटले जाते. कारण, याआधी सलमान खानचे (Salman Khan) अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. परंतु, सलमान खानला ॲक्शन अवतारात आणून प्रभू देवाने तो करिष्मा करून दाखवला ज्याची दबंग खानला खूप गरज होती. यानंतर सलमान बहुतेक ॲक्शन चित्रपटांमध्ये दिसला आणि हा फॉर्म्युला त्याच्यासाठी हिट ठरला.

हेही वाचा: Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीचा आर्यनला सल्ला

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी चित्रपटांची लाइनअप पाहता कदाचित त्यानेही सलमान खानचाच मार्ग अवलंबला असावा असे वाटते. शाहरुख खानला किंग ऑफ रोमान्स देखील म्हटले जाते. त्याच्या सलग फ्लॉप चित्रपटांमध्ये तो सॉफ्ट टोन कॅरेक्टर किंवा रोमान्स करताना दिसला. कदाचित किंग खानला आता हे समजले असेल की वाढत्या वयाबरोबर रोमान्स त्याच्यासाठी काम करत नाही आहे.

५६ वर्षीय शाहरुख खानला ब्रह्मास्त्रमध्ये जबरदस्त ॲक्शन करताना पाहून लोक शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. त्याचबरोबर जवान आणि पठाणमध्येही तो ॲक्शन करताना दिसणार आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. शाहरुख खान या प्रयोगाबाबत पुरेपूर आत्मविश्वास बाळगून आहे. या चित्रपटांना लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.