esakal | शाहरुखसाठी दीपिका-सलमान करणार बुर्ज खिलाफावर शूटिंग
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh salman and deepika

शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

शाहरुखसाठी दीपिका-सलमान करणार बुर्ज खिलाफावर शूटिंग

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

हिंदी चित्रपटसृष्टीत बादशाह म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार म्हणजेच शाहरूख खान. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतो. मात्र झिरो या चित्रपटानंतर शाहरुखचा कोणता चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे त्याला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दीपीका पादुकोण आणि जॉन इब्राहीम यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे शाहरुखचा जवळचा मित्र सलमानसुद्धा यामध्ये झळकणार आहे. 

'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो संपल्यानंतर पठाण आणि टायगर ३ च्या शूटिंगसाठी जाणार असल्याचा खुलासा सलमानने केला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा बिग बॉस चालू होईल असंदेखील त्याने सांगितलं होतं. त्यामुळे सलमानदेखील पठाणमध्ये काम करणार आहे हे प्रेक्षकांना समजलं. शारूखच्या झिरो चित्रपटात सलमानने एका गाण्यामध्ये डान्स केला होता. त्यानंतर आता पठाण चित्रपटात या दोघांची जोडी दिसणार आहे. सलमान  पठाण चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दिसणार आहे. 20 ते 25 मिनीटांसाठी सलमान या चित्रपटात काम करणार असून या सीनचे शूटींग दुबईतील बुर्ज खलिफावर होणार आहे. १५ दिवस हे चित्रीकरण चालू राहील. 

हेही वाचा : लहान बाळासोबत करीना व तैमुर; काय आहे 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य?

हेही वाचा : 'जात महत्त्वाची नसून..'; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत 

या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पठाण सोबतच सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.