
बॉलिवूडचा किंग आज जरी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत असला तरी तो त्याच्या चाहत्यांसाठी एव्हरग्रीनच राहणार. त्यांने बॉलिवुडच नाही तर अवघ्या जगाला त्याच्या अभिनयाने भूरळ घातली आहे. जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे वाढदिवसाला सुरुवात होताच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. मुंबईत तर त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली होती.
मात्र शाहरुख संदर्भात एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे वाढदिवसाआधीच शाहरुख एका अडचणीत अडकला आहे. खंर तर या समोर आलेल्या व्हिडिओत एक कार टो करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ही कार शाहरुख खानची असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान हा व्हिडिओ मीडिया फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इस्टांग्राम व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी दावा करण्यात आला आहे की शाहरुख खानची मर्सिडीज-बेंझ एस-क्लास टो करण्यात आली आहे.रिपोर्ट्सनुसार, शाहरुखच्या या कारची किंमत 1.59 कोटी आहे.मात्र हि कार शाहरुखची आहे का आणि का टो करण्यात आली आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही.
मात्र हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनी कमालीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे शाहरुखला काही जास्त त्रास होणार नाही,त्याने त्याला काही फरक पडणार नसल्याचंही म्हटंल. तर काही युजर्स यावर गमतीशीर कमेंट केल्या आहेत.
एकानं लिहिलंय, ‘ईएमआय वेळेवर भरणार नाही’,तर नंहर प्लेटवर राजस्थानचे मूख्यमंत्री अशोक गहलोत यांच बॅनर लावण्यात आल्यानं काहींनी त्यावरही कमेंट केल्या आहेत. त्यामुळे ते तिथ काय करत आहे असा सवाल करण्यात आला आहे .तर एकानं कमेंट करतंय लिहिलयं की शाहरुख खानचा वाढदिवस आहे, आज तरी हे अजिबात करायचं नव्हतं.
शाहरुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर तो आता पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटात दिसणार आहे.पठाणमध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या पठाण चित्रपटाचं टीझर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.