Shah Rukh-Deepika: शाहरुख अन् दिपिकाच्या जोडीनं जिंकल!त्यांच्या 'या' चित्रपटांनी गाजवला काळ.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan, Deepika Padukone

Shah Rukh-Deepika: शाहरुख अन् दिपिकाच्या जोडीनं जिंकल! त्यांच्या 'या' चित्रपटांनी गाजवला काळ..

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाला जगभरातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. या चित्रपटच्या माध्यामातुन शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय.

तर यातूनच बॅालीवुड सुपरस्टार शाहरूख आणि दिपिका यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दिपिकाच्या चाहत्यांचीही संख्या कमी नाही. चाहत्यांना शाहरुख आणि काजोलची जोडी जितकी प्रिय आहे तितकेच शाहरुख आणि दिपिकाच्या जोडीचेही चाहते बरेच आहेत. प्रेक्षकांना या जोडीला पाहण्याचीही उत्सूकता होतीच.

हेही वाचा: Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल

याआधी काही चित्रपटामधून या जोडीचा अभिनय आपण पाहिला आहे. या जोडीचे या आधीचेही चित्रपट बॉक्स ऑफिस मध्ये सुपरहिट ठरले आहे. यापुर्वी हे दोघे कोणत्या चित्रपटात एकत्र दिसले हे पाहूयात.

हेही वाचा: Pathaan Movie Release: इंदूरमध्ये पठाणचे अनेक शो रद्द, थिएटरला आग लावण्याची धमकी तर प्रेक्षकांना पळवले..

ओम शांति ओम

ओम शांति ओम

ओम शांति ओम

२००७ मध्ये रिलिज झालेला ओम शांति ओम हा चित्रपट शाहरूख खान आणि दिपीकाच्या करीअरला कलाटणी देणारा ठराला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर तर ठरलाच मात्र अजूनही त्याची क्रेझ कायम आहे.

फराह खान यांनी दिगदर्शित केलेल्या या चित्रपटात दिपीका पादुकोणने डेब्यू केला. ओम शांति ओम ने बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील गाणीही खुप गाजली. त्याचबरोबर शाहरुखसोबत काजोल व्यतिरिक्त दुसऱ्या अभिनेत्रीबरोबरची जोडी चाहत्यांना आवडली.

हेही वाचा: Pathaan Review : 'डोक्याची गोळी घेऊन जा! 'पठाण' पाहिल्यावर घ्यावीच लागेल'

चेन्नई एक्सप्रेस

चेन्नई एक्सप्रेस

चेन्नई एक्सप्रेस

२०१३ मध्ये आलेला शाहरूख खान आणि दिपीकाचा 'चेन्नई एक्सप्रेस' हा बॉक्स ऑफिसवर एखाद्या एक्सप्रेससारखाच चालला. शाहरूख खान आणि दिपीकाचा सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. चेन्नई एक्सप्रेसने बॉक्स ऑफिस वर २२७ करोडची कमाई केली. सर्वात जास्त कमाई करून देणारा चित्रपट ठरला. राहुल आणि मिनाच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

हॅप्पी न्यू इयर

हॅप्पी न्यू इयर

हॅप्पी न्यू इयर

फराह खानने दिग्दर्शित केलेला हॅप्पी न्यू इयर हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर बराच गाजला. या चित्रपटात शाहरूख आणि दिपिका यांच्या उत्कृष्ट जोडीनं हॅप्पी न्यू इयरने कमाल केली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८० करोडचं कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन केलं.