बिचारा पठाण ! लाडक्या गौरीला पहिल्या व्हँलेटाईनला दिलं होतं प्लॅस्टिकचं गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Khan  Shahrukh Khan.

बिचारा पठाण ! लाडक्या गौरीला पहिल्या व्हँलेटाईनला दिलं होतं प्लॅस्टिकचं गिफ्ट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र आज शाहरुख त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या लव्ह स्टोरीमुळे चर्चेत आला आहे.

आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शाहरुखने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी #AskSRK सेशन सुरु केलं. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं काही चाहत्यांनी किंग खानला त्याच्या प्रेमाबद्दल काही प्रश्न केले.

आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि या प्रसंगी, #AskSRK सत्रादरम्यान, किंग खानने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. एका यूजरने शाहरुख खानला विचारले की, 'तू गौरी मॅमला दिलेलं पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट काय होतं?' यावर शाहरुख खानने उत्तर दिले, "आता त्याला ३४ वर्षे झाली आहेत, जर मला बरोबर आठवत असेल तर... कदाचित गुलाबी रंगाचे प्लास्टिक कानातले दिले होते. ."

याशिवाय एका चाहत्याने किंग खानला व्हॅलेंटाइन गिफ्टबद्दल प्रश्न विचारला. फॅनने लिहिले की, 'व्हॅलेंटाइन डे निमित्त तुम्हाला तुमच्या चाहत्यांकडून काय गिफ्ट हवे आहे.' यावर शाहरुख म्हणाला, "तुम्ही सर्वांनी मला आधीच खूप काही दिलं आहे... पठाणसाठी खूप प्रेम." तर, दुसर्‍याने विचारले, 'व्हॅलेंटाईन डेवर डीडीएलजे पहावा की पठाण? कृपया लवकर उत्तर द्या. मला शोमध्ये जायचे आहे. यावर किंग खान म्हणाला, 'व्हॅलेंटाइन डे हा पठाण डे असावा.'

टॅग्स :Shah Rukh Khanviraltweet