
शाहिद कपूरला मोठा झटका; प्रदर्शनानंतर 1 तासात लीक झाला 'Jersey'
शाहिद कपूरचा(Shahid kapoor) 'जर्सी'(Jersey) सिनेमा आज २२ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला अन् तासाभरात ऑनलाइन लीकही(Leak) झाला. यामुळं सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 'जर्सी' हा तेलुगु सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. सिनेमाचं टायटल हिंदीत रीमेक करताना बदलेलं नाही. तसंच, गौथम तिन्नानुरीनेच या हिंदी रीमेकचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी उचलली आहे. तेलुगु मध्ये देखील गौथम तिन्नानुरीनंच जर्सीचं दिग्दर्शन केलं होतं. तर,नानी या तेलुगु सुपरस्टारनं ओरिजनल तेलुगु 'जर्सी' मध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारली होती. हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर,मृणाल ठाकूरसोबत पंकज कपूरही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत. हा एक स्पोर्ट ड्रामा असून क्रिकेटचं जग यात अनुभवताना वडील-मुलाच्या नात्यातील भावबंध देखील अनुभवता येणार आहे.
हेही वाचा: 'बायकोसाठी त्याच्या कानफटात मारली,तिनं माझीच जिरवली'; विल - जेडाचा घटस्फोट?
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'जर्सी' सिनेमाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहिलं गेलं. प्रेक्षकचं नाही तर सेलिब्रिटी सर्कलमधूनही सिनेमाला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. पण आता प्रदर्शनानंतर सिनेमा पायरसीचा शिकार झाल्याच्या वृत्तानं निर्माते मात्र मोठ्या संकटात सापडलेयत.
हेही वाचा: 'जर्सी' सिनेमातील शाहिदचे चौकार-षटकार पाहून पहा काय म्हणालाय साऊथ सुपरस्टार
सिनेमाचं प्रदर्शन गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून लांबणीवर पडलं होतं. आता कुठे सिनेमाला प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला अन् प्रतिसादही चांगला मिळत होता पण आता सिनेमा लीक झाल्यानं वेगळंच टेन्शन निर्माण झालं. हा सिनेमा तामिलरॉकर्स ,टेलिग्राम ,123movies,123movierulz आणि Filmywap, onlinemoviewatches अशा काही ऑनलाइन साइटवर लीक झाल्याची बातमी आहे. बातमी आहे की सिनेमा लीक झाल्यानंतर गुगलवर सिनेमा मोफत डाऊनलोड करुन घेण्यासाठी लोकं की-वर्ड्स सर्च करताना दिसत आहेत.
Web Title: Shahid Kapoors Jersey Leaked
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..