Pathaan: १२ वर्षाखालील मुलांना घेऊन पठाण पहायला जाताय..मग ही बातमी तुमच्याचसाठी...

pathaan, shah rukh khan
pathaan, shah rukh khanEsakal

शाहरुख खान स्टारर 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी, ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (BBFC) ने चित्रपटाला 12A प्रमाणपत्र दिले आहे. बोर्डाने आपल्या वेबसाइटवर 12A प्रमाणपत्र देण्याचे कारणही दिले आहे.

ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्मने चित्रपटाला 12A प्रमाणपत्र देण्यामागे या चित्रपटात हिंसा, सेक्स, भयपट आणि धमकीची दृश्ये असल्याच नमूद केलं आहे. या चित्रपटात बंदुकीच्या गोळीतून बाहेर पडणारे रक्त दाखवण्यात आले आहे जे मुलांसाठी योग्य नाही.

pathaan, shah rukh khan
Aai Kuthe Kay Karte: एकीकडे नातीचं बारस तर दुसरीकडे आजीचं लग्न... अरुंधतीसमोर प्रश्न

त्याच बरोबर चित्रपटात वेश्याव्यवसाय देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत या चित्रपटाला 12A प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे कारण बोर्डाने सांगितले आहे. त्यामुळे १२ वर्षाच्या खालील मुलांना हा चित्रपट पाहण्यासाठी बंधन असणार आहेत.

146 मिनिटांच्या या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी मुलांवर चुकीची परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा चित्रपट १२ वर्षांखालील मुलांना एकट्याने पाहण्याची परवानगी नाही. मुले त्यांच्या पालकांसोबत हा चित्रपट पाहू शकतात.

pathaan, shah rukh khan
Rakhi Sawant Video Viral: 'आई आजारी तरी मी 'पठाण'वर रिल बनवणार', राखीची अजब इच्छा

त्याचबरोबर परदेशात चित्रपटाला 12A प्रमाणपत्र मिळणे म्हणजे हा चित्रपट मुलांना दाखवण्यापूर्वी पालकांनीही या चित्रपटाचा आपल्या मुलांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असणार आहे.

pathaan, shah rukh khan
Pathaan रिलीज होतोय अन् चर्चा Don 3 ची रंगलीय..शाहरुख उद्या म्हणे डबल धमाका करणार..जाणून घ्या

बीबीएफसीच्या वेबसाईटवरही या चित्रपटातून एक सीन काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख च्या 'पठाण' चित्रपटातून कोणता सीन हटवण्यात आला आहे याबाबत पुष्टी झालेली नाही.

pathaan, shah rukh khan
Shah Rukh Khan Pathaan: पठाणच्या विरोधात उभे राहिले बंगाली, बंगालमध्ये शाहरुखविरोधात पेटला नवा वाद

भारतात, पठाणला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यूए प्रमाणपत्र दिले आहे. UA प्रमाणपत्र देण्यापूर्वी या चित्रपटात 10 कट करण्यात आले आहेत. यादरम्यान दीपिकाचे काही क्लोज-अप शॉट्स चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि काही संवादही बदलण्यात आले. या पूर्वी टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनच्या वार चित्रपटातील काही दृश्ये ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन तर्फे काढण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com