Shah Rukh Khan : 'किंग खान' ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाचा निर्णय कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh khan

Shah Rukh Khan : 'किंग खान' ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाचा निर्णय कायम

Shah Rukh Khan : चित्रपट अभिनेता शाहरुख खानला पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणाच सुप्रीम कोर्टाना मोठा दिलासा दिला आहे. 2017 मध्ये रईस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात

त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने यापूर्वी खटला रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाचा या निर्णयामुळे शाहरुख खानाला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते जितेंद्र सोलंकी यांनी शाहरुख खानविरोधात वडोदरा येथील न्यायालयात तक्रार केली होती.

हेही वाचा: Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या प्रकरणात जामीन मंजूर

नेमकं प्रकरण काय ?

2017 मध्ये शाहरुख खान त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीला ट्रेनने निघाला होता. यावेळी ही ट्रेन अनेक स्थानकांवर थांबली होती. यावेळी या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते. यादरम्यान, ट्रेन गुजरातमधील वडोदरा स्टेशनवर थांबली होती. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी सारखी परिस्थीती निर्माण झाली. यात फरीद खान नावाच्या व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. तसेच काहीजण जखमी झाले होते.